मोहन सारस्वत
जामनेर (जि. जळगाव) : विजेच्या ट्रान्स्फॉर्मरमधील ऑइल काढण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. यात तीन महिलांसह पाचजण जखमी झाले. ही घटना जामनेरातील श्रीराम पेठ भागात रविवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिस ठाण्याबाहेर सायंकाळी गर्दी जमा झाल्याने शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सायंकाळी घडलेल्या घटनेची फिर्याद रात्री दाखल झाली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून ८ ते १० संशयितांविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन जखमींना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.