जळगाव : जळगाव ते फर्दापूर हा रस्ता जालना राष्ट्रीय महामार्ग पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत येतो. त्यामुळे याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केली होती. गुप्ता यांनी ही तक्रार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग पीआययु जळगावला केल्या. मात्र हा रस्ता जळगाव विभागाच्या अख्त्यारीत येत नसल्याने जळगावचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी या तक्रारीची दखल घ्यावी, असे पत्र जालना विभागाचे कार्यकारी अभियंता ओंकार चांडक यांना केली आहे. त्यानुसार आता ही तक्रार जालना विभागाकडे वर्ग झाली आहे.
मी तुमचा नोकर नाही - चांडक
तक्रारदाराला महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याची दादागिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव ते फर्दापूर या रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल जळगावचे सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी तक्रार केली होती. याबाबत पाहणी करण्यासाठी जालना विभागाचे कार्यकारी संचालक ओंकार चांडक हे जळगावला येणार होते. या तक्रारीबाबत विचारणा करण्यासाठी गुप्ता यांनी चांडक यांना फोनवरून चौकशी केली होती. मात्र त्यावेळी चांडक यांनी ‘मी तुमचा नोकर नाही’ अशा शब्दात तक्रारदारालाच सुनावले.
औरंगाबाद मार्गावर होत असलेले काम निकृष्ट असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या जालना पीडब्ल्यूडीकडे येतो. त्यानुसार गुप्ता यांनी चांडक यांच्याकडे तक्रार केली. या मार्गाची पाहणी करण्यासाठी चांडक हे स्वत: मंगळवारी जळगावला येणार होते. मात्र काही कामानिमित्त ते येऊ शकले नाहीत. त्यावेळी गुप्ता यांनी त्यांना आपण तक्रारीची चौकशी केव्हा करणार, अशी विचारणा केली. त्यावर चिडलेल्या चांडक यांनी तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांनाच मी तुमचा नोकर नाही. तुम्ही तक्रार केली आहे. त्यावर कारवाई केली जाईल. मात्र त्याबाबत आपण विचारु शकत नाही. मी जनतेचा नाही तर सरकारचा नोकर आहे. अशा शब्दात चांडक यांनीच गुप्ता यांना सुनावले.