शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

अ वर्ग पालिकेची एकाच बंबावर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2017 12:21 AM

पालिकेची बेफिकिरी : दुसरा बंब दुरुस्तीसाठी पुण्यात, ट्रॅक्टरसह टॅँकरचाही अभाव

भुसावळ : नाशिक विभागात एकमेव अ वर्ग असलेल्या भुसावळ पालिकेकडे आजमितीला अवघा एकच अगिAशमन बंब कार्यरत आह़े शहरात असलेली मर्मस्थळे व उन्हाळ्याचे दिवस पाहता लागणा:या आगीच्या घटना तातडीने आटोक्यात आणण्यासाठी पर्यायी बंब असणे अत्यंत आवश्यक आह़ेदरम्यान, पालिकेकडे दुसरा बंब असलातरी त्याच्या पंपातही बिघाड झाल्याने महिना-दोन महिन्यांपासून हा बंब पुण्यात दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला आहे, मात्र तो दुरुस्त होणार कधी? याबाबत अनिश्चितता आह़ेबंबच काय टँकरही नाहीशहराला तापीचे नदीचे वरदान असलेतरी उन्हाळ्यात शहराच्या विस्तारीत  भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत़े अशा पाश्र्वभूमीवर त्या-त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करणे पालिकेची जबाबदारी आहे, मात्र आजमितीला पालिकेकडे ट्रॅक्टर तर सोडाच साधा टँकरही नाही त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने हजार ते दोन हजार रुपये देऊन खासगी टँकर आणून तहान भागवावी लागत़े मध्यंतरी विस्तारीत भागातील महिलांनी उपनगराध्यक्षांच्या दालनात ठिय्या मांडून तीव्र संताप व्यक्त केला होता़टँकर निघाले भंगारातपालिकेकडे काही काळापूर्वी अधिक  प्रमाणावर टँकर होते, मात्र त्यांची झीज होऊन पत्रा सडल्याने मोठय़ा प्रमाणावर त्यांना गळती लागल्याने हे टँकर वापरायोग्य न राहिल्याने त्यांना पालिकेच्या जलशुद्धीकरण विभागात अडगळीत टाकण्यात आले आहेत़ उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने तातडीने नव्याने टँकर खरेदी केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आह़े महिना-दोन महिन्यांपासून पुण्यात दुरुस्तीसाठी पाठवण्यात आलेल्या पालिकेच्या अग्निशमन विभागातील बंब दुरुस्तीचे साधे इस्टिमेटही पालिकेला अद्याप मिळालेली नाही त्यामुळे नेमके इस्टिमेट कधी येऊन ते मंजूर होणार? बंबाची दुरुस्ती कधी होऊन तो शहरात परत येणार? हा सर्व प्रकार चमत्कारिक आह़े विशिष्ट मर्यादेर्पयत वाहन दुरुस्तीवर खर्च पालिकेला करता येतो तर दुसरीकडे उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतर एकाच बंबावर शहराची मदार आह़े 4दुरुस्तीसाठी पुण्यात पाठवण्यात आलेला बंबाचा फायर पंप नादुरुस्त झाला आहे. तो जिल्ह्यात दुरुस्त होत नाही म्हणून त्यास पुण्यात पाठवण्यात आल्याचे मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांनी सांगितल़े लवकरच बंबाची दुरुस्ती होऊन तो परतणार असल्याचेही ते म्हणाल़े4टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडे ना टँकर आहे ना पर्यायी बंब. त्यामुळे वेळीच दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आह़े 1 सुमारे दोन लाखावर लोकसंख्या असलेल्या शहरात ऑर्डनन्स फॅक्टरी, लष्करी डेपो, दीपनगर प्रकल्प, जंक्शन रेल्वे स्थानक आदी मर्मस्थळे आहेत तर उन्हाळ्यात विविध कारणान्वये लागणा:या आगींचे प्रमाण पाहता एक बंब पुरेसा नाही़ शहरातील यापूर्वीच्या घटना पाहता एकच बंब आग विझविण्यासाठी धडपड करताना दिसून येतो व पाणी संपल्यानंतर पाणी बंब भरून आणण्यार्पयत इकडे पुन्हा आग भडकून मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत़े गेल्या अनेक महिन्यांपासून अगिAशमन विभागाचा बंब खराब झाला असतानाही पालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आह़ेपालिका करणार         सहा ट्रॅक्टरची खरेदीशहराची गरज लक्षात घेता पालिकेकडून लवकरच सहा ट्रॅक्टरची खरेदी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर म्हणाले. मात्र ट्रॅक्टरप्रमाणे पाणीपुरवठा करणारे टँकरही खरेदी केल्यास विविध कार्यक्रमांसह टंचाई काळात नागरिकांना दिलासा मिळणार आह़े