जामनेर : टाकरखेडे, ता.जामनेर जि.प. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील यांच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची दखल जिल्हा परिषद जळगावच्या शिक्षण विभागाने आपला जिल्हा आपले उपक्रम या ई बुक मध्ये घेतली.तालुक्यातील हा एकमेव उपक्रम असून ई बुकात पाचव्या क्रमांकावर उपक्रमाची दखल घेण्यात आली.मुख्याध्यापक पाटील यांनी "स्वच्छता" विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या विकासासाठी उपक्रम मार्च महिन्यात राबविला. लॉकडाऊनच्या काळात पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन घराची, शाळेची स्वच्छता , कपड्यांची स्वच्छता , शौचालयाची स्वच्छता, परिसर स्वच्छता, अन्नाची, पाण्याची स्वच्छता, स्वच्छतेचे महत्त्व या बाबतीत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे.विद्यार्थ्यांना कळले स्वच्छतेचे महत्वया नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळले, आरोग्य सुदृढ बनले, त्यांचेत स्वच्छते विषयी आवड निर्माण झाली. चांगल्या सवयी लागल्या. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर इतर स्वच्छते विषयी विद्यार्थ्यांनी काळजी घेतली. स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्या. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला. कृतिशील विचारांची चालना मिळाली.पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी पूर्वकल्पना देवून शाळेतील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सहभागी करून स्वच्छता उपक्रम दररोज सकाळी ७.०० ते ८.३० वाजेच्या दरम्यान शालेय आवारात व परिसरात राबविला.नवोपक्रमाचे फायदेविद्यार्थी सुका कचरा व ओला कचरा ओळखू लागले व वेगळा करू लागले. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी व रोगराई पसरते हे विद्यार्थ्यांना समजू लागले. पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करू लागले. बाहेरून आल्यावर हात - पाय स्वच्छ धुवू लागले. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये हे विद्यार्थ्यांना समजू लागले. विद्यार्थ्यांचा नकारात्मक दृष्टीकोन बदलला.उपक्रमाबद्दल पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी व स्वच्छतेचे महत्त्व कळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी जळगाव डायटच्या प्राचार्या मंजूषा क्षिरसागर, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील शिक्षक रविंद्र चौधरी, विकास वराडे, जयंत शेळके, जयश्री पाटील, छाया पारधे, रामेश्वर आहेर यांचेसह विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले.
टाकरखेडे शाळेच्या मुख्याध्यापकांचा स्वच्छता उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 3:41 PM
मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील यांच्या उपक्रमाची दखल जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आपला जिल्हा आपले उपक्रम या ई बुक मध्ये घेतली.
ठळक मुद्दे जिल्हा परिषदेच्या ई बुकने घेतली दखलजामनेर तालुक्यातील हा एकमेव उपक्रम