चाळीसगाव : जागतिक वारसा सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा झाल्याने सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक वारसा स्थळांवर स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आल्या. याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावतफर्फे २५ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव तालुक्यातील जवळपास ९०० वर्ष पुरातन असलेले वाघळी येथील मुंधोई माता मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबवून आपला जागतिक वारसा जतन करण्याचा संदेश देण्यात आला आहे. याठिकाणी मंदिराचा संपूर्ण परिसर झाडून तसेच मंदिरांमध्ये असलेले जाळे काढून स्वच्छता करुन पुरातत्व विभागाच्या जागतिक वारसा सप्ताहामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानने आपला सहभाग नोंदवला आहे.यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, प्रकाश नायर, शुभम चव्हाण, गजानन मोरे, दिगंबर शिर्के, रवींद्र सूर्यवंशी, विवेक रणदिवे, रवींद्र दुशिंग, जयवंत शेलार, जितेंद्र वाघ, सचिन पाटील, हेमंत भोईटे, प्रतीक पाटील, मनोज भोळे, गौरव पाटील, सचिन घोरपडे ,अजय घोरपडे, प्राजक्ता घोरपडे, चैताली गुंजाळा, विराज वाघ, राज भोळे आदी उपस्थित होते.
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त मुधोईमाता मंदिरावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 3:18 PM
वाघळी येथील मुंधोई माता मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबवून आपला जागतिक वारसा जतन करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
ठळक मुद्दे सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रमसप्ताहात राबवले विविध उपक्रम