भुसावळ : नाहाटा वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एनएसएस स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वराडसीम दत्तक गावात स्मशानभूमीची स्वच्छता करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्यात आला.
गावातून रॅलीद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. या वेळी कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.डी. गोस्वामी तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे भुसावळ विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पी.ए. अहिरे हे होते. तसेच वराडसीम ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभा जंगले व पंडित नेहरू विद्यालयाच्या पर्यवेक्षक एम.जे. चौधरी उपस्थित होत्या. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र नाडेकर, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ममताबेन पाटील व एनएसएसचे स्वयंसेवक उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. पी.ए. अहिरे यांनी एनएसएस स्थापना दिनाचे निमित्त साधून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.
सरपंच प्रतिमा जंगले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. ए.डी. गोस्वामी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत नाहाटा महाविद्यालय नेहमीच एक पाऊल पुढे असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शुभम पाटील, विक्रांत रोडे, हर्षल चव्हाण, चेतना पाटील, सागर सोनवणे, सागर पाटील, वैभव पाटील, शुभम सोनार, आकाश बोदडे, खुशाल मानकर, स्वप्निल डोळसे, आकाश सपकाळे, गायत्री बजाज, संजना दुधानी, कल्याणी पराळे आदी विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य. एम.व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस.व्ही. पाटील, उपप्राचार्य बी.एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य ए.डी. गोस्वामी व डॉ. एन.ई. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. रोहित पुलीवार व संजना दोधानी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. ममता पाटील यांनी मानले.
वराडसीम येथे स्मशानभूमीची स्वच्छता करताना नाहाटा महाविद्यालयाचे एनएसएसचे विद्यार्थी. (छाया : श्याम गोविंदा)