भुसावळ, जि.जळगाव : येथील रेल्वेस्थानकावर जीवन ज्योती फाऊंडेशन व रेल्वे स्कूलचे विद्यार्थी यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.विभागात स्वच्छ भारत मोहिमेवर भर देण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागातील सर्व ए १, ए आणि बी श्रेणीतील १५ स्थानकांची चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दर शनिवारी या सर्व स्थानकांच्या संपूर्ण स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. ज्यासाठी बाहेरील स्वयंसेवी संस्थांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याअंतर्गत भुसावळ रेल्वेस्थानकाच्या दक्षिण दिशेला स्टेशन व स्टेशन परिसरात सकाळी जीवन ज्योती फाऊंडेशन व रेल्वे स्कूल विद्यार्थी यांच्या व स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्रमदान करण्यात आले. तसेच रेल्वे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रवाशांना स्वच्छतेविषयी माहिती दिली.अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुणकुमार, स्टेशन संचालक जी.आर.अय्यर, स्टेशन मॅनेजर मनोज श्रीवास्तव, वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, नीलेश बाथो, रेल्वे हायस्कूलचे सतीश कुलकर्णी, सतीश उपाध्यक्ष आणि सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी उपस्थितीत श्रमदान करण्यात आले.
भुसावळ रेल्वेस्थानकावर स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 4:18 PM
भुसावळ रेल्वेस्थानकावर जीवन ज्योती फाऊंडेशन व रेल्वे स्कूलचे विद्यार्थी यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
ठळक मुद्देभुसावळ विभागातील सर्व ए १, ए आणि बी श्रेणीतील १५ स्थानकांची चार भागांमध्ये विभागणीदर शनिवारी सर्व स्थानकांच्या संपूर्ण स्वच्छतेची काळजी रेल्वे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रवाशांना दिली स्वच्छतेविषयी माहिती