रिकव्हरी रेट वाढला
जळगाव: जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६.९२ टक्के झाले आहेत. हे प्रमाण काही दिवसांपासून कमी अधिक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली आहे. मंगळवारी हे प्रमाण वाढले होते.
सक्रीय रुग्ण घटले
जळगाव : जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३९२ वर आली असून काही दिवसांपूर्वी ती ५०० वर पोहोचला आहे. यात २७० रुग्णांना लक्षणे नसून १२२ रुग्णांना लक्षणे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जीवघेणा खड्डा
जळगाव- शहरातील अजिंठा चौफुलीवर मोठा खड्डा पडला असून याकडे गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे हा खड्डा जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या अगदी मधोध हा खड्डा पडलेला आहे.
अहवाल संचालकांकडे
जळगाव : चाळीसगावातील शिक्षक बदली लाचप्रकरणातील तक्रारी संदर्भता झालेल्या चौकशीचा अहवाल आता शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. समितीने चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे हा अहवाल सोपविला आहे.
सिव्हीलमध्ये सजावट
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच्या मुख्य इमारतीच्या परिसरातही भींतीवर आकर्षक चित्रे रेखाटली जात असून यामुळे शोभेत भर पडली आहे. रुग्ण व नातेवाईकांना प्रसन्न वाटावे, यासाठी पंधरा दिवसांपासून परिसरात काम सुरू आहे.
मान्यतेची प्रतीक्षा
जळगाव: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ऑक्सिजन टँकच्या पाईपलाईनचे कामही पूर्ण होणत असताना पेसो समितीच्या मान्यतेची मात्र अद्याप प्रतिक्षा आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर हा टँक कार्यान्वयीत होणार आहे.
वाहनांवर कारवाई
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बेशीस्त वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. सुरक्षा रक्षक थेट वाहनांच्या चाकातील हवा काढून घेत असून पार्किंगचे नियम सर्वांनी पाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
चाचण्या चार लाखांकडे
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या ३९०४९९ पर्यंत पोहोचली आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने लवकरच ही संख्या ४ लाखांवर पोहोचणार आहे. सध्या आरटीपीसीआर चाचण्या अधिक करण्याचे नियोजन सुरू आहे.