ऑनलाईन लोकमत नंदुरबार, दि.6 - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सध्या अवैध प्रवासी वाहतूक तसेच खाजगी वाहतुकीकडे प्रवाशांचा वाढता कल या समस्यांना सामोरे जावे लागत आह़े त्यामुळे एसटीचे बहुसंख्य फे:यांचे भारमान कमी झाले आह़े त्यामुळे जिल्ह्यातील काही बसफे:याचे भारमान कमी झाले असल्याने त्या बंद होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आह़े 60 टक्क्यांपेक्षा कमी भारमान असलेल्या लांब पल्ल्याच्या बसफे:या रद्द करण्याचे आदेश महाव्यवस्थापकांनी प्रत्येक आगारप्रमुखांना दिले असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, नवापूर या प्रमुख आगारातीलही कमी भारमान असलेल्या बसफे:या बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती देण्यात आली़ ज्या लांबपल्ल्याच्या बसफे:यांमधून एसटी महामंडळ तोटा सहन करीत आहे अशा फे:या सध्या कात्रीत सापडल्या आहेत़ सध्या एसटी महामंडळाला अवैध प्रवासी वाहतूक, विविध संवर्गाना प्रवासात मिळणारी सुट, प्रवाशांचा खाजगी वाहतुकीला देण्यात येणारे प्राध्यान्य, अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे प्रवाससेवेवर होणारा परिणाम अशा एकनाअनेक समस्यांना सामोरे जावे लागत आह़े
प्रवासी संख्या घटली तर बसफेरी बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 6:06 PM
नंदुरबारसह अक्कलकुवा, शहादा, नवापूर आगारातील बसफे:यांना फटका
ठळक मुद्दे60 टक्क्यांपेक्षा कमी भारमान असलेल्या फे:या रद्द करामहाव्यवस्थापकांचे एस.टी.विभागाला आदेशअक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, नवापूर येथील आगारांना फटका