लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.८- तालुक्यातील मौजे नांद्रा बु.।। या गावातील देशीदारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर केल्यानंतरही हे दुकान बंद झालेले नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवार, दि.८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन दिले. यावेळी सर्व कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करूनही तसेच सनदशीर मार्गाने मागणी व आंदोलन करूनही हे दारू दुकान बंद होत नसल्याने हतबल झालेल्या या महिलांनी गावातील दारू दुकान बंद करण्याचे आदेश द्या, नाहीतर आम्हीच त्या दुकानाची तोडफोड करू, असा इशारा दिला. त्यावर जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसांत स्वत: भेट देऊन पाहणी करण्याचे व कारवाईचे आश्वासन दिले. शौचालयात न्यायच्या ‘टमरेल’मध्येही दारू नांद्रा गावात असलेल्या देशीदारू दुकानामुळे वयस्कर अथवा प्रौढच नव्हे तर किशोरवयीन मुले देखील दारूच्या आहारी गेल्याची या महिलांची तक्रार आहे. अगदी शौचास न्यायच्या ‘टमरेल’मध्ये (पत्र्याच्या डब्यात) पाणी नेतात. आणि येताना त्यात दारू घेऊन पितात. मुलगा, वडिल सगळेच दारू पितात, आणि घरात येऊन गोंधळ घालतात. त्रास देतात. त्यामुळे महिलांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार या महिलांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. ठराव होऊनही दुकान सुरूच हे देशीदारू दुकान बंद करण्याची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच जिल्हाधिकारी, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात आले होते. त्याअनुषंगाने २१ जुलै २०१७ रोजी हे दारू दुकान बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. त्यात गावातील ११८२ महिलांपैकी ६५१ महिलांनी सहभाग घेऊन ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यानुसार ग्रामपंचायतने सविस्तर अहवाल, ठरावासह तसेच ठरावावेळच्या व्हीडीओ रेकॉर्र्डींगसह जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर केला. मात्र अद्यापही हे दारू दुकान बंद झालेले नाही. त्यामुळे या महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून तेथून मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. दोन दिवसांत जिल्हाधिकारी स्वत: भेट देणार जिल्हाधिकाºयांनी स्वत: दोन दिवसांत नांद्रा गावाला भेट देऊन पाहणी करण्याचे व कारवाईचे आश्वासन या महिलांना दिले.
गावातील दारू दुकान बंद करा नाहीतर तोडफोड करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 4:14 PM
नांद्रा बुद्रुकच्या महिलांचा इशारा: दोन दिवसांत स्वत: भेट देऊन कारवाई करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आश्वासन
ठळक मुद्देग्रामसभेत ठराव मंजूर केल्यानंतरही दुकान सुरूचगावातील ११८२ महिलांपैकी ६५१ महिलांनी केलेय ठरावाच्या बाजूने मतदानदोन दिवसांत जिल्हाधिकारी स्वत: भेट देणार