शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

मुदत संपल्याने सर्व वाळू ठेके बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:05 PM

प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळूचोरी मात्र जोरात

जळगाव : वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत असल्याने जिल्ह्यातील सर्व वाळू ठेके सोमवारी मध्यरात्रीपासून बंद होत असून आता नवीन लिलाव प्रक्रियेनंतरच वाळू उपसा सुरू होईल. सध्या देखील लिलाव झालेल्या १७ वाळू गटांपैकी जेमतेम ५ गटच सुरू होते. ते देखील बंद झाल्याने याआधी देखील प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली वाळूचोरी मात्र जोरात सुरू होणार आहे.जिल्ह्यातील ४० वाळू गटांना राज्याच्या पर्यावरण समितीची मंजुरी मिळाली होती. मात्र त्यापैकी जेमतेम १७ वाळू गटांचा दोन टप्प्यातील लिलाव प्रक्रियेनंतर ठेका गेला होता. तर न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रक्रिया रखडल्याने उर्वरीत वाळू गटांचा लिलाव रखडला. आता जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी उरल्याने या वाळूगटांना प्रतिसाद मिळणार नाही, हे गृहित धरून प्रशासनाने या वाळूगटांच्या लिलावाचा नाद सोडून दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाळूची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यासोबतच वाळूचोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.अवैध डंपर्स होतात वैधमागील आठवड्यात खेडी ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ९ डंपर पकडले होते. त्यातील काही डंपर विना क्रमांकाचे होते. जळगाव तहसीलदारांनी पथकासह जाऊन व तालुका पोलिसांना सोबत नेऊन हे डंपर ताब्यात घेऊन तालुका पोलीस स्टेशनसमोर जमा केले होते. विना क्रमांकाचे डंपर आरटीओकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले होते. मात्र खेडी अथवा आव्हाणे येथील वाळू गटाचा ठेका गेलेला नाही. तसेच लिलाव घेतलेल्या वाळू गटातून वाळू वाहतूक करण्यासाठी वाहन नोंदणी क्रमांक टाकून त्या पावत्या त्या ठेक्यातून वाळू नेणाऱ्या वाहनाच्या चालकाकडे देण्यात येतात. मात्र या पकडलेल्या वाहनांपैकी काही डंपर विनाक्रमांकाचे व नोंदणी क्रमांकाची खाडाखोड केलेले असतानाही त्यांच्या पावत्या वैध ठरवित ही वाहने सोडून देण्यात आली. नवीन वाळू धोरणानुसार अवैध वाळू वाहतूक करणाºया डंपरला अडीच लाखांचा दंड करण्यात येतो. ताब्यात घेतलेल्या नऊ डंपर्सला नियमानुसार २० ते २२ लाखांचा दंड आकारणे आवश्यक होते. मात्र या वाहनांकडे वैध पावत्या असल्याचे कारण देत हे डंपर्स सोडण्यात आले. त्यामुळे शासनाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. शासनाचा महसूल दुसºयाच तिजोरीत गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता तर वाळूचे ठेके बंद झाल्याने वाळू चोरीला ऊत येणार असून या वाळूचोरांना पाठीशी घालणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावणार आहे. जिल्हाधिकाºयांकडून मात्र याकडे सोयीस्कर कानाडोळा होत आहे.हे वाळू गट झाले बंद...पर्यावरणाची संमती मिळालेल्या ४० वाळू गटांपैकी केवळ १७ वाळू गटांचाच लिलाव झाला होता. त्यापैकी जोगलखेडा, बेलव्हाळ-१, बेलव्हाळ-२, बेलव्हाळ-३ हे ठेके २९ सप्टेंबर रोजी, खापरखेडा ता.अमळनेरचा ठेका १४ सप्टेंबर रोजी, जामोद ता.जळगावचा ३० आॅगस्ट रोजी, माहिती ता.पाचोरा हा ठेका १५ आॅगस्ट रोजी, कुरंगी ता.पाचोरा हा ठेका २५ सप्टेंबर रोजी बंद झाला होता. तर आव्हाणी ता.धरणगाव, सावखेडा ता.जळगाव, बाभुळगाव ता.धरणगाव, बोहरे ता.अमळनेर, कलाली ता.अमळनेर हे ठेके ३० सप्टेंबरपासून बंद झाले आहेत. त्यामुळे आता पुढील लिलाव प्रक्रिया होईपर्यंत वाळू उपसा बंद राहणार आहे. या काळात झालेला सर्व उपसा हा अवैध असणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव