आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : विद्यार्थ्यांसाठी गोदावरी कॉलेज ते पाळधी दरम्यान सुरू केलेली शटल बस सेवा अवघ्या दोन महिन्यात बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.उमविसाठी एस.टी.ने केवळ १४ फेºया सुरु केल्या आहेत. मात्र त्या पुरेशा नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षाद्वारे प्रवास करावा लागत आहे.उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात दिवसभरात एसटीच्या १४ फेºया सुरू आहेत. मात्र या फेºया सुरू असूनही उमवि व राष्टÑीय महामार्गालगतच्या महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. महामार्गालगत रिक्षा चालकांकडून विद्यापीठ व अन्य महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींनीची रिक्षांमधून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षांमधून प्रवास करावा लागत आहे. गोदावरी ते पाळधीची शटल बससेवा महिन्यातच बंद पडली आहे.विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता, विद्यापीठ व जळगाव आगाराकडून जुने बसस्थानक ते उमविपर्यंत बससेवा सुरू गेल्यावर्षी करण्यात आली. सुरुवातीला दिवसभरात ३० फेºया असलेल्या या बससेवेचा सध्या १४ फेºया सुरू आहेत. या रस्त्यावरून दिवसभरात सुमारे १ हजाराहून अधिक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे उमविसाठी सुरू असलेल्या बसफेºया या अपूर्ण पडत असून, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. उमवि, एसएसबीटी महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत वेळोवेळी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी संघटनांकडून बससेवेबाबत आंदोलन करूनदेखील या समस्येकडे कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही.कोंबून भरले जाताहेत विद्यार्थीएसटीकडून १४ फेºया सुरू असल्या तरी अनेकदा वाहक-चालक मिळत नसल्याने काही फेºया रद्द होतात. त्यामुळे एसटीचे नियोजन नसल्याने रिक्षाचालकांना याचा लाभ होत आहे. रिक्षांमधून विद्यार्थ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. शिवकॉलनी स्टॉपपासून ते उमवि गेटपर्यंत विद्यार्थ्यांकडून १५ रुपये, तर उमवि मुख्य इमारतीपर्यंत २० रुपये घेतले जातात. तसेच रिक्षाचालक रिक्षांमध्ये तब्बल आठ ते दहा विद्यार्थ्यांना कोंबून भरत असतात. यामुळे महामार्गालगत विद्यार्थ्यांना जीवदेखील धोक्यात टाकावा लागत आहे.अनेकदा रिक्षांमध्ये मुलांसोबत मुलींनादेखील बसविले जाते. यामुळे विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रमाणदेखील वाढले आहे.गोदावरी ते पाळधीची शटल बससेवा महिन्यातच बंदएसटी प्रशासनाकडून गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय ते पाळधी दरम्यान बससेवा सुरू केली होती. जेणेकरून महामार्गालगत येणाºया शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांचे हाल थांबतील, मात्र अवघ्या दोन महिन्यातच ही सेवा बंद झाली. आॅगस्ट २०१६ मध्ये ही बससेवा सुरू केली होती. एसटीकडून या बससेवेला प्रतिसाद न मिळाल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र एसटीकडून या बससेवेबाबत कु ठलीही माहिती प्रवाशांपर्यंत पुरविण्यात आली नाही.तसेच स्पेशल बससेवा असल्याची कुठलीही ओळख या बसवर देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही बससेवा अवघ्या दोन महिन्यात बंद पडली.
जळगावातील ‘गोदावरी’ ते पाळधी शटल सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:33 AM
उमविच्या बस फेºया न वाढविल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने करावा लागतोय रिक्षाद्वारे महामार्गावरून प्रवास
ठळक मुद्देगोदावरी ते पाळधी शटल सेवा दोन महिन्यात बंदउमविसाठी एसटीने सुरु केलेल्या १४ फेºया अपूर्णविद्यार्थ्यांना नाईलाजाने जावे लागत आहे रिक्षाद्वारे