जामनेर, जि.जळगाव : राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच महिला बचत गटाच्या सदस्यांनी टाकावू कपड्यांपासून तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे प्रदर्शन लावून त्या अल्पदरात देण्यात आल्या.या ठिकाणी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी राहुल पाटील यांनी भेट देऊन पिशव्यांचे वितरण केले.पालिकेत झालेल्या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी उपस्थिती देऊन खरेदी केली. शहरातील आयडियल, जय मातादी, सप्तशृंगी यासह अन्य अशा पाच गटांचा यात सहभाग होता.यात प्रामुख्याने शिल्पा कल्याणकर, मालती माळी, मंगला आंबेकर, मनीषा माळी, लक्ष्मी पाटील आदींनी या पिशव्या तयार केल्या होत्या.जिल्ह्यातील हा पहिलाच स्तुत्य उपक्रम आहे. नगरसेविका संध्या पाटील, शीतल सोनवणे, लीना पाटील, हेमलता पवार, अशपाक देशमुख, नुरूद्दीन शेख, समाधान वाघ, अरुण जाधव उपस्थित होते. आत्माराम शिवदे यांनी सूत्रसंचालन, तर संजय सोनार यांनी आभार मानले.जळगाव जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोगनागरिकांनी केली कापडी पिशव्यांची खरेदीशहरातील मान्यवरांनी लावली हजेरी
बचत गटांनी बनविल्या कापडी पिशव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:44 PM