जळगाव : सर्व्हर वारंवार बंद पडणे, संथ गती त्यातच खंडित वीजपुरवठा यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. वारंवार अडचणी निर्माण होत असल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता तर औद्यागिक वसाहतमध्ये योग्यता प्रमाणपत्रासाठीही प्रचंड गर्दी झाली होती. वाहन निरीक्षक नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या वाहनधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.रात्री उशिरा पर्यंत गर्दी कायम होती. दोन्ही ठिकाणी वाहन धारक व कर्मचाºयांमध्ये किरकोळ वादही झाले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाचे अनेक टप्पे आॅनलाईन झाले आहेत. १ फेब्रुवारी सारथी-४ ही प्रणाली आॅनलाईन प्रणाली सुरु झाल्याने शिकाऊ परवाना याच प्रणालीद्वारे काढावा लागत आहे. त्यातच वारंवार सर्व्हर बंद पडणे, कधी त्याला गती नसणे तर कधी वीज पुरवठा बंद होणे यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. अनेक उमेदवार दिवसभर थांबून आल्या पाऊले माघारी जात आहेत.आठ संगणकावर चालते कामपरिवहन कार्यालयात परवान्यासाठी आठ संगणक आहेत. त्यात इंटरनेटच्या दोन लाईन देण्यात आल्या आहेत. एका लाईनवर आयएमव्ही व व्हेरीफीकेशन तर दुसºया लाईनवर परीक्षा घेतली जाते. उमेदवारांच्या मते सर्व्हरची गती कमी असल्याने दोनच संगणकावर हे काम घेण्यात येत आहे तर अधिकाºयांच्या मते आॅनलाईनमुळे नेहमीप्रमाणे उमदेवार येत नाहीत, त्यामुळे काही वेळा संगणक बंद असतात. मंगळवारीही प्रचंड हाल झाले.वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आज संगणक बंद होते, त्यामुळे किरकोळ गोंधळ उडाला. सर्वच कार्यालये आॅनलाईन असल्यामुळे काही वेळा सर्व्हरची गती कमी होते. सध्या उमेदवारच कमी येत असल्याने परवाने कमी निघतात. दोन दिवस काम बंद असल्याने योग्यता प्रमाणपत्रासाठी आज गर्दी झाली.-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीदुपारपर्यंत निरीक्षकच नसल्याने वाहनधारकांचा संताप गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक व निरीक्षकांच्या परिक्षेमुळे कार्यालयात वाहन निरीक्षक नसल्याने योग्यता प्रमाणपत्राचे काम चार दिवस बंद होते. मंगळवारी हे काम सुरु होणार असल्याने वाहनधारकांना सकाळपासून एमआयडीसीत बोलावण्यात आले होते, मात्र दुपारपर्यंत निरीक्षकच नसल्याने वाहनधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वादाचे प्रसंग घडले. तेथे वाद सुरु असल्याचे समजताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी तातडीने निरीक्षकांना तेथे रवाना केले.
सर्व्हर बंद व वाहन निरीक्षकाअभावी ‘आरटीओ’ कार्यालयात गोंधळ
By admin | Published: February 22, 2017 12:43 AM