शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 7:58 PM

बैठक : जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या सूचना

\जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून युध्द पातळीवर काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. ग्रामीण भागातील संशियत रुग्णांना नजिकच्या ग्रामीण रुग्णालयातच भरती करून त्यांच्यावर आवश्यक तो प्रथमोपचार करावा. रुग्णास जिल्हास्तरापर्यंत आणण्याची आवश्यकता भासली, तर त्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागांच्या विभागीय आयुक्तांकडून त्यांच्या विभागातील कोरोना विषाणू संदर्भातील माहिती जाणून घेतली. त्यानंतर आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, पोलीस उप अधिक्षक नीलाभ रोहण, प्रशांत सोनवणे, अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, डॉ. दिलीप पाटोडे, वामन कदम, मिनीनाथ दंडवते आदी आदींची उपस्थिती होती़गंभीर परिस्थिती उद्भवल्यास विद्यापीठ, महाविद्याय येथे उभारले जाणार वार्डकोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अत्याधुनिक सुविधा असलेल्या वॉर्डसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालये, जैन हिल्स अशा संस्थांच्या ठिकाणीही असे वॉर्ड उभारण्यात येतील,अशीही माहिती जिल्हाधिकांरी यांनी बैठकीत दिली़विनाकारण गर्दी होणार नाही, दक्षता घ्यारोखण्याकरीता जनजागृतीसाठी आवश्यक वाहन व तत्सम सामग्री प्रशासनाकडून पुरविण्यात जातील़ त्याचबरोबर पोलिस, आरोग्य सेवेतील सर्व घटक, नगरपालिकांच्या सर्व यंत्रणांना मुख्यत्वे बाहेर किंवा जनता संपर्कातील कामे करावी लागत असल्याने त्यांना प्रशासनाकडून मास्क व आवश्यक ती काळजी घेण्यासाठी साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले़ सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी आपापल्या कार्यालयात विनाकारण गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकरी डॉ. ढाकणे यांनी दिल्या.हॉटेल चालकांना फक्त होम डिलेवरी देता येणारजळगाव शहर किंवा जिल्ह्यातील अन्य शहरात नोकरी, उद्योग, व्यापार, शिक्षण आदी कारणांमुळे अनेक व्यक्ती आपल्या गावापासून तसेच कुटुंबापासून वास्तव्यात आहेत, अशा नागरिकांची जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी हॉटेल मालक, चालकांना हॉटेल सूरू न ठेवता फक्त गरजू ग्राहकांसाठी घरपोहोच (होम डिलेवरी) सेवा सुरू ठेवावी. होम डिलेवरी सेवा सुरू ठेवताना हॉटेल चालकांनी सर्व्हिस काऊंटर सुरू राहणार नाही. याची विशेष दक्षता पाळणे आवश्यक असल्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ हॉटेलात कोणीही ग्राहक प्रत्यक्ष जेवण करण्यासाठी किंवा जेवण घेवून जाण्यासाठी येता कामा नये. याचे उलंलघन झाल्यास हॉटेल चालक, मालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव