शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

दोन हेक्टरवरील झाडांचा कोळसा

By admin | Published: February 20, 2017 1:03 AM

रुईखेडा जंगलात आग : ठिणगी पडल्याचा संशय, ग्रामस्थ व वनविभागाच्या प्रयत्नांनी मिळाले नियंत्रण

मुक्ताईनगर : तालुक्यातील रुईखेडा वनविभागाच्या हद्दीतील जंगलात शनिवारी दुपारी लागलेल्या अचानक आगीमुळे जवळपास दोन हेक्टर वनजमिनीवरील झाडे, पालापाचोळा जळून खाक झाला़ परिस्थितीचे गांभीर्य राखत वनपाल, वनकर्मचारी व ग्रामस्थांनी संयुक्तपणे प्रयत्न केल्याने आगीवर नियंत्रण मिळाल्याने मोठी वनहानी टळली़ मुक्ताईनगर उपविभागीय वनखात्याच्या अंतर्गत येणा:या रुईखेडा वनहद्दीतील कंपार्टमेंट नं.528 मध्ये शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोठी आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे आकाशात धुरांचे लोळ दिसत असतानाच आगीने जवळपास दोन हेक्टर वनजमिनींर्पयत रुद्र रूप धारण केले. यासंदर्भात शेतक:यांनी वनविभागाला माहिती देताच वनपाल डी.एन. कोळी, सी.व्ही.पाटील व एस.एम. पवार यांनी तत्काळ आगीचे स्थळ गाठल़े याप्रसंगी वनविभागाला कर्मचा:यांनी आगीचे क्षेत्रफळ वाढू नये म्हणून सर्वप्रथम आग लागलेल्या चहूबाजूने मातीने पालापाचोळा दाबण्यात आला. त्यानंतर शेतक:यांच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचा:यांनी प्रयत्न केले. त्यासाठी नारखेडे व पाटील नामक रुईखेडय़ाच्या शेतक:यांची मदत झाली. दरम्यान, वनसंपदा व वन्यप्राण्यांचे महत्त्व लक्षात घेता वनविभागाने आग न लागण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा आह़े  (वार्ताहर)़़तर वन्यप्राण्यांचा जीवावरही बेतले असते4रुईखेडा जंगलात मोठय़ा प्रमाणावर वन्यजीव प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. ज्यात सांबर, हरीण, कोल्हे, बिबटय़ा व गेल्या दोन महिन्यांपूर्वीच      पट्टेदार वाघाचे वास्तव्य निदर्शनास आले आहे. उन्हाळय़ाची सुरुवात      होत असताना आगीचीदेखील सुरुवात झाल्याने ही बाब  वन्यजीव प्राण्यांच्या अस्तित्वावरच घाला घालणारी असल्याचे बोलले जात आह़े  जंगलाला लागूनच मोठय़ा प्रमाणावर शेतीदेखील असल्याने प्रसंगी   आगीच्या भक्षस्थानी पडृू शकत होती. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाप्रमाणेच ग्रामस्थ व शेतक:यांनीदेखील आगीसारख्या घटना न घडण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आह़े शेतक:यांनी शेताचे बांध साफ करताना विशेष दक्षता घ्यावी़ वनविभागाच्या हद्दीतून जाताना ग्रामस्थांनी देखील रस्त्याने जाताना धुम्रपान टाळावे तसेच पेटलेली विडी वा काडी जंगलाच्या गवतावर फेकू नय़े वन कर्मचा:यांना गस्त वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़  - पी.टी.वराडे,  वनक्षेत्रपाल