जळगाव : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून डाक विभागातर्फे विशेष रद्दबातल शिक्का घेऊन येत आहे. डाक विभागातर्फे देशभरातील ८१० मुख्य डाक कार्यालयात चित्रित डिझाइनसह या विशेष `रद्दबातल` शिक्क्यांचे अनावरण करण्यात येणार असून, यामध्ये जळगाव डाक विभागाचाही समावेश असल्याची माहिती जळगाव डाक विभागातर्फे कळविण्यात आली आहे.
छंद किंवा कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी डाक विभागाने फिलिटिस्टसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार एखादी व्यक्ती देशातील कुठल्याही पोस्टाच्या कार्यालयात २०० रुपये भरून `फिलेटिक` डिपॉझिट खाते उघडू शकते. हे खाते उघडल्यानंतर त्या व्यक्तीला पोस्टाकडून शिक्के व विशेष कव्हर्ससारख्या वस्तू मिळतात. तसेच या व्यक्तिरिक्त विविध स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मारकांची तिकिटेही डाक विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले असल्याचे डाक विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
इन्फो :
रद्दबातल शिक्के म्हणजे काय
डाक विभागाच्या जळगाव व चाळीसगाव येथील मुख्य कार्यालयात २१ जून रोजी बुक झालेले सर्व टपाल सुरुवातीला विशेष शिक्क्याने छायांकित केले जातील. त्यानंतर हिंदी व इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या `आंतराष्ट्रीय योग दिवस २०२१` लिहिलेले ग्राफिकल डिझाइनसह विशेष छायांकित रद्दबातल शिक्के हे शाईने छायांकित करण्यात येतील. यावेळी त्यावर `वापरण्यात आलेले डाक तिकीट पुन्हा वापरण्यात येऊ नये` असा शिक्का मारण्यात येईल. तसेच एकदा वापरलेल्या तिकिटाचा पुन्हा वापर होऊ नये, म्हणून ज्या पोस्टाच्या शिक्क्याने छायांकित केेले जातील. त्या शिक्क्याला रद्दीकरण असे म्हटले जात असल्याचे पोस्ट विभागातर्फे कळविण्यात आले आहे.