जळगाव : उत्तरेकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे उत्तरेकडून महाराष्टÑाकडे येणाºया थंड वाºयांमुळे थंडीची लाट पसरली आहे. त्याचाच परिणाम जळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे. शुक्रवारी शहराचा पारा १० अंशापर्यंत खाली आली आला होता. तसेच शुक्रवारी शहराच्या किमान तापमानाने या हंगामातील सर्वात निच्चांक गाठला.गेल्या चार दिवसांपासून तापमानात सारखी घट होत आहे. थंडीच्या लाटेमुळे नागरिक रात्रीच्या वेळेस बाहेर निघणे टाळत आहेत. त्यामुळे रात्री ७ नंतर मुख्य रस्त्यांवरील वर्दळ देखील कमी झालेली दिसून येत आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातील उपनगरांमध्ये नागरिक शेकोट्या पेटवताना दिसून येत आहे. तसेच किमान तापमानासह कमाल तापमानातही घट झाली असल्याने रात्रीसह दिवसा देखील गारवा निर्माण झाला आहे.पुढील आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा अंदाजएकीकडे राज्यात उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे थंडीची लाट पसरली असताना, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा कल छत्तीसगडसह महाराष्टÑाकडे वाढत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाऊ स न झाल्यास ढगाळ वातावरण तरी पहायला मिळणार आहे.यामुळे किमान तापमानात वाढ होवून थंडीचा जोर कमी होण्याचीही शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केली आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून तापमानात घट झाल्यामुळे रब्बी पिकांना फायदा होत आहे. मात्र,पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज असल्याने रब्बीला फटका बसण्याचीही शक्यता आहे.वाºयांचा वेग अधिक असल्याने गारवाथंडीच्या लाटेसह येणाºया वाºयांचा वेग नेहमीपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी शहरात ताशी १८ ते २० किमी वेगाने वारे वाहत असल्याने थंडीचे प्रमाण वाढले होते. अजून दोन दिवस थंडीचे प्रमाण कायम राहणार असून, पारा ८ अंशापर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. मात्र, पुढील आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगावात थंडीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:29 AM