ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 23 - दुचाकीवरुन तीन सीट जाणा:या तरुणांना थांबवून वाहन परवाना विचारला असता त्यांनी हुज्जत घालून वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची घटना शहरातील टॉवर चौकात घडली. याप्रकरणी स्वप्नील युवराज पाटील (वय 21), कृष्णा युवराज पाटील (वय 19) व दीपक प्रकाश पाटील (वय 21) तिन्ही रा.ममुराबाद, ता.जळगाव या तिघांविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.वाहतूक शाखेचे कर्मचारी श्यामकांत लाड आणि भाऊराव ओंकार इंगळे हे टॉवर चौकात डय़ुटीवर असताना शिवाजीनगर उड्डाण पुलाकडून स्वपAील, कृष्णा व दीपक हे तिन्ही जण दुचाकीवर (क्र.एम. एच.19.बी.वाय.6652) टॉवर चौकाकडे येत होते. लाड यांनी त्यांना सिग्नलवर अडविले. दुचाकी चालविणा:याकडे वाहन चालविण्याचा परवाना तसेच कागदपत्रे मागितले. मात्र त्यांनी उर्मटपणे उत्तरे देत पोलिसांशी वाद घातला. धक्काबुक्कीत इंगळे खाली पडले. लाड यांनाही तिघांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्यानंतर तिघांना पकडून शहर पोलीस स्टेशनला नेले. भाऊराव इंगळे यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहतूक पोलिसाची भर चौकात पकडली कॉलर
By admin | Published: April 23, 2017 4:12 PM