जळगाव : गल्लीत खेळत असताना घरी उशिराने येतो यासह अन्य किरकोळ कारणावरून आदित्य नीलेश चव्हाण (वय ७) या बालकाला पालकांनी अमानुषपणे मारहाण करीत तोंडात कापडाचा बोळा कोंबला तसेच तळपायाला चिमट्याने चटके दिल्याची संतापजनक घटना शनिवारी सकाळी कांचननगरात उघडकीस आली.दरम्यान, याप्रकरणी बालकाचे पालक सुनील विश्वनाथ भगीरथी व माया भगीरथी या दोघांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील याला अटक करण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी या बालकासह त्याच्या पालकांना शनिपेठ पोलीस स्टेशनला आणले होते. पोलिसांनी या बालकाची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून उपचार केले.दोन दिवसांपासून पालकांकडून बालकाला मारहाणयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कांचननगरातील दर्गासमोर सुनील विश्वनाथ भगीरथी व माया हे दाम्पत्य दोन महिन्यांपासून भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत. आदित्य नावाचा मुलगा त्यांच्यासोबत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे दाम्पत्य किरकोळ कारणावरून आदित्यला मारहाण करीत होते. शनिवारी सकाळी ९ वाजता पुन्हा हा प्रकार घडला.पालकाला अटकगुन्हा दाखल झाल्यानंतर पालक सुनील भगीरथी याला अटक करण्यात आली. त्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तर बालक आदित्य हा रात्री उशिरापर्यंत शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात होता. संस्था किंवा बालनिरीक्षणगृहात त्याला दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.उडवाउडवीच्या उत्तराने बळावला संशयशनिपेठ पोलीस स्टेशनला भागीरथी दाम्पत्याला आणल्यानंतर उपनिरीक्षक सुरेश सपकाळे यांनी पालकांची चौकशी केली असता आदित्य हा बहिणीचा मुलगा असल्याचे माया हिने सांगितले. ते औरंगाबाद येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे नाव व मोबाइल क्रमांक विचारला असता त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दोघांकडून देण्यात आली. सुनील भगीरथी हा चालक असल्याचे सांगतो. यापूर्वी शिवाजीनगरात वास्तव्याला होतो, मात्र तेथे वडिलांशी पटत नसल्याने कांचननगरात वास्तव्याला आल्याचे तो सांगत होता. मुलाला बाहेर कोणीही मारहाण केली की तो आमचेच नाव सांगतो असेही सुनील सांगत होता. उपनिरीक्षक सुरेश सपकाळे यांनी या बालकाला जिल्हा रुग्णालयात आणले व उपचार केले.शेजारी शैलेंद्र काशिनाथ सपकाळे, रत्नाबाई अनिल सपकाळे, राहुल सैंदाणे, आशा पंडित सपकाळे, विकास सपकाळे, बबलू सपकाळे, सुनीता सुनील माळी व कल्पना माळी यांनी या बालकाला विश्वासात घेत विचारले असता पालक मारहाण करीत असून पायाला चटके दिले आहेत तसेच तोंडात कापडाचा बोळाही कोंबत असल्याची माहिती बालकाने दिली. ही माहिती ऐकून शेजारी हादरले. त्यांनी भगीरथी कुटुंबाला जाब विचारत त्यांना बालकासह पोलीस ठाण्यात आणले. बालकाच्या चेहºयावर मारहाणीचे व चिमट्या घेतल्याचे व्रण होते.
जळगावात सात वर्षांच्या बालकाला पालकांनी दिले चटके अन् तोंडात कोंबला कापडाचा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:06 PM
कांचननगरातील संतापजनक प्रकार
ठळक मुद्देशेजाऱ्यांमुळे उघड झाली घटनादाम्पत्याविरुद्ध गुन्हा