शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

सरकारच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधील कॉलेज जळगावात सुरू

By अमित महाबळ | Published: September 08, 2022 3:55 PM

जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची भर पडली असून, येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

जळगाव :

जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची भर पडली असून, येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. अधिष्ठातापदी डॉ. अविनाश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या जागेतच हे महाविद्यालय सुरू होत आहे. 

जळगाव जिल्ह्यात चिंचोलीला मेडिकल हब मंजूर असून, त्यामध्ये वैद्यकीय (एमबीबीएस), आयुर्वेद, दंत, होमिओपॅथी, फिजिओथेरेपी महाविद्यालये मंजूर आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एप्रिल २०१७ मध्ये याची घोषणा झाली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मेडिकल हब ओळखले जाते. या ठिकाणी सर्वात आधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे काम होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.  

वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या जागेत, तर आयुर्वेद महाविद्यालय शिरसोली रस्त्यावरील भाड्याच्या इमारतीत सुरू झाले असून, आता होमिओपॅथी कॉलेजचा मार्ग मोकळा झाला आहे. या कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. अविनाश महाजन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. रितेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील हे पहिलेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आहे. त्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे. 

पहिली बॅच ५० विद्यार्थ्यांचीयेत्या शैक्षणिक सत्रापासून होमिओपॅथीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. पहिली बॅच ५० विद्यार्थ्यांची आहे. सद्यस्थितीत आयुर्वेद महाविद्यालयाच्या परिसरातच कॉलेजला जागा मिळाली आहे. मात्र, कॉलेज व रुग्णालयासाठी प्रशस्त जागेचा शोध घेतला जात आहे. 

जळगावकरांना मिळणार ओपीडी कॉलेजसाठी नऊ शिक्षक व रुग्णालयासाठी चार वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर करण्यात आली आहे. या कॉलेजमुळे होमिओपॅथीची बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) जळगावकरांना उपलब्ध होणार आहे.

अशी होईल प्रवेश प्रक्रियानीटचा रिझल्ट लागल्यानंतर गुणवत्ता यादीनुसार, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमस या पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडेल. याशिवाय विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व गुणवत्तेनुसार विद्याशाखेचा प्राधान्यक्रम निवडून शकतात, अशी माहिती मिळाली.