बसमध्ये ही कोटिंग प्रवासी बसत असलेल्या आसनांचे लोखंडी अँगल, खिडक्या, दरवाजा, प्रवाशांना धरण्यासाठी असलेले लोखंडी पाइप आदी ठिकाणी हे कोटिंग केले जात आहे. प्रवाशांचा या ठिकाणी स्पर्श झाला तरी, कोरोनाचा संसर्ग या ठिकाणाहून पसरणार नसल्याचा धावा महामंडळाने केला आहे. त्यामुळे महामंडळातर्फे बसेसवर ‘अँटिमायक्रोबियल’ कोटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून जळगाव आगारात या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यावेळी विभाग नियंत्रक भगवान जगनोर, मुख्य यांत्रिक अभियंता श्रावण सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, नीलेश पाटील, वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी, एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी गोपाळ पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.
इन्फो :
जिल्ह्यातील ५५० बसेसवर होणार कोटिंग
विभागीय वाहतूक नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व आगार मिळून ५५० बसेसवर अँटिमायक्रोबियल कोटिंग’ करण्यात येणार आहे. या प्रक्रियेची सुरुवात जळगाव आगारातून करण्यात आली असून, इतर आगारांमध्येही लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले.