मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यात दुधाळ जनावर खरेदीस बचत गटांना सूक्ष्म कर्जपुरवठा करण्याकामी बँक व बचतगट यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या लखनौ (उ.प्र.) येथील भारतीय मायक्रो फायनान्स या खासगी कंपनीने ३० बचतगटांच्या २४९ सभासदांना साडेआठ लाख रुपयात गंडविल्याची माहिती समोर येत आहे.या कंपनीमार्फत कर्ज घेणाºया सभासदांनी सव्याज कर्जाची पूर्ण परतफेड करूनही त्यांना आता आयडीबीआय बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा दिल्या जात आहे. यामुळे सभासद हवालदिल झाले आहे, तर कर्जाची नियमित फेड पूर्ण करूनही थकबाकीदार झालेल्या बचतगटांना नव्याने कर्ज मिळत नसल्याने बचत गटांच्या माध्यमातून जीवमान उंचविण्याच्या योजनेस खीळ बसली आहे.पिंप्री आकाराऊत शिवारातील गंगा दूध डेअरी येथे कार्यालय असलेल्या भारतीय मायक्रो फायनान्स या खासगी कंपनीची तालुक्यातील बचत गटांना सूक्ष्म कर्ज वाटप आणि वसुलीबाबत आयडीबीआय शाखा मुक्ताईनगर यांच्याशी संलग्नता होती. या अनुषंगाने भारतीय मायक्रो फायनान्स या कंपनीने तालुक्यातील बचत गटांना दुधाळ जनावरे खरेदीसाठी सूक्ष्म कर्ज वाटप केले होते. यात ३० बचत गटांच्या २४९ सभासदांना शेकडा २३ टक्केच्या घरात व्याज दराने गाई व म्हशीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. १३ टक्के व्याज दर आयडीबीआय बँकेचे तर १० टक्के व्याज दर या खाजगी कंपनीला मिळत होतेडिसेंम्बर २०१५ मध्ये या कंपनीने बचत गटाच्या सभासदांना दुधाळ म्हशी व गाईसाठी सूक्ष्म कर्ज दिले होते. यात बचत गटांकडून अखंडपणे दर १५ दिवसाने हप्ता भरला जात होता. याप्रमाणे २४९ सभासदांनी संपूर्ण रक्कम व्याजासह कंपनीकडे जमा केली. तशा रकमा भरण्याच्या पावत्या व कंपनीकडील ‘नील’चे दाखलेही घेतले. मात्र कर्ज चुकते करणाºया या सभासदांना नुकतेच आयडीबीआयकडून २ ते १० हजार कर्ज थकीत असल्याचे नोटिसा मिळाल्या आहेत. कर्ज सव्याज फेडूनही नोटीसा हातात पडल्याने या सभासदांनी बँकेत धाव घेतली. जमा पावत्या ‘नील’चे दाखले दाखविले.कर्जफेडीचे सबळ पुरावे बँकेत दाखविले असता आपण रकमा योग्यप्रकारे भारतीय मायक्रो फायनान्स कंपनीकडे भरल्या आहेत. परंतु या कंपनीने त्या रकमा तुमच्या नावे बँकेत भरले नसल्याने तुम्ही थकीत झाले आहात, परिणामी तुम्हाला नोटिसा दिल्या जात असल्याचे बँकेकडून सांगितलेजात आहे.यामुळे सभासद अधिकच हवालदिल झाले आहे.दरम्यान, कंपनीने दर पंधरवाड्याला सूक्ष्म कर्ज देयपोटी रकमा जमा केल्या. परंतु जानेवारी २०१९ पासून या कंपनीच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यात सातत्याने रकमा कमी भरल्या. अशात आटोडेबिट खात्यातून सभासदांच्या रकमा कमी भरल्या. गेल्या परिणामी सूक्ष्म कर्जदार सव्याज रकमा भरूनही बँकेत थकबाकीदार झाले आहे.भारतीय मायक्रो फायनान्स ही कंपनी खाजगी कंपनी असून तिचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट १५, सेक्टर आय, जानकी विहार, जानकीपुरम, लखनऊ येथे आहे. या कंपनीचे येथे आगमन २०१५ मध्ये झाले होते. पिंप्रीआकाराउत शिवारातील गंगा डेअरी फार्म येथे त्यांनी कार्यालय उभारले होते आणि ग्रामीण भागात सर्वे करून गरजूंना दुधाळ जनावरांसाठी सूक्ष्म कर्ज पुरवठा करीत होते.कंपनीत या ठिकाणी एक वरिष्ठ कर्जपुरवठा अधिकारी आणि चार कर्ज पुरवठा अधिकारी असे पाच कर्मचारी होते. सभासद सव्याज रकमा भरूनही थकबाकीदार झाल्याने या कर्मचाऱ्यांकडे त्यांनी तगादा लावला. परिणामी सर्वच कर्मचाºयांनी राजीनामे दिले आहे. आता बँकेच्या नोटिसा मिळत असल्याने सभासद त्यांच्या घरी तगादा लावत असल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत. वरून या कर्मचाºयांना चार महिन्यांपासून पगारदेखील मिळाला नाही.आम्ही दर पंधरवड्याच्या हिशोबाने दुधाळ जनावरांसाठी घेतलेले कर्ज व्याजासहीत चुकते केले आहे. त्याच्या पावत्याही आमच्याकडे आहे. पूर्ण कर्जफेड करूनही मला आठ हजार थकबाकीबाबत आयडीबीआय बँकेची वसुली नोटीस मिळाली आहे. त्यामुळे धक्काच बसला. बँकेत गेल्यावर तुमच्या कर्ज खात्यात पूर्ण रक्कम भरली नसल्याने तुम्हाला वसुली नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता आम्ही रोजच बँकेच्या चकरा मारत आहे. परंतु प्रकरण निकाली निघत नाही.-योगिता अनिल कोळी, अंतुर्ली जे बचत गट सभासद महिलाबचत गटाच्या २४९ सभासदांनी संपूर्ण कर्ज वसुली दिली आहे. कंपनीचे खाते आयडीबीआय बँकेत दोनपैकी एक खाते आटोडेबिट असल्याने त्या रकमा आपोआप कापल्या जात होत्या. जून २०१९ पासून या खात्यात अपूर्ण रकमामुळे अनियमितता झाली आणि सभासद व्याजासह कर्ज भरूनही थकबाकीदार झाले आहेत. आज हे सभासद आमच्या घरी येऊन जाब विचारत आहे. याचा आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनी सहकार्य करीत नाही. वैतागून आम्ही राजीनामा दिला आहे.-दीपक इंगळे, कर्जपुरवठा अधिकारीभवरतीय मायक्रो फायनान्स कंपनी ही नॉनबँकिंग कंपनी आहे. सभासदांनी त्यांच्याकडे रकमा भरले आहेत. तसे कागपत्र ते दाखवत आहेत. परंतु आमच्याकडे सभासदांच्या खात्यावर पूर्ण रक्कम भरलेली नाही. म्हणून त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. बँकेने या प्रकरणात सदर कंपनीसोबत संपर्क साधला आहे. आमचे मुख्य कार्यालयदेखील पाठपुरावा करीत आहे. महिन्याभरात तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.-तुषार पाटील, शाखा व्यवस्थापक, आयडीबीआय बँक, मुक्ताईनगर
लखनो येथील कंपनीने ३० बचतगटाच्या सभासदांना साडेआठ लाख रुपयात गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 4:25 PM