ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15- जळगावातून विमानसेवेचे स्वप्न पूर्णत्वास येण्याचे दिसून येत असेल तरी विमानाचे तिकीट मिळत नसल्याने गुरुवारी अनेकांचा हिरमोड झाला. तिकीट मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नसल्याचे सांगण्यात आले. जळगाव येथून 23 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा झाली व यामुळे व्यापारी, उद्योजक तसेच सर्वानाच फायदा होणार असल्याने याचा आनंद झाला. अनेकांनी 23 रोजी पहिल्याच दिवसाचे तर काहींनी त्यानंतरच्या तारखांचे तिकीट काढण्यासाठी एअर डेक्कन कंपनीच्या संकेतस्थळावरून प्रयत्न केले. मात्र ब:याच प्रयत्नानंतरही तिकीट मिळाले नाही. त्यामुळे सर्वाचा हिरमोड झाला.
जळगावातून विमानसेवा सुरू होण्याचा आनंद आहे. 23 रोजी जळगाव ते मुंबईचे तिकीट काढायचे होते. यासाठी गुरुवारी आपण एअर डेक्कन कंपनीच्या संकेतस्थळावरून तिकीट मिळविण्याचा प्रयत्ने केला. मात्र संकेतस्थळ खुले होत असले तरी तिकीटाबाबतची लिंक नाही की काहीही माहिती नाही. त्यामुळे तिकीट मिळून शकले नाही. यासाठी कंपनीचे टोल फ्री क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला असता काही क्रमांक चुकीचे लागले तर काही क्रमांक लागलेच नाही. सेवा सुरू होणार असेल तर तिकीट मिळण्याची सोय करणे आवश्यक आहे. - पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.