आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - सूचनेनुसार काम केले नाही म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार महिला व बालविकास अधिकारी रफीक तडवी यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वेळेत कामे होण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शिवाजी दिवेकर यांनी प्रत्येक विभागाचे वर्क कॅलेंडर तयार करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले होते. त्यानुसार कामकाजाचा आढावा घेत असताना सोमवारी १४ रोजी दुपारी १ वाजता दिवेकर यांनी तडवी आपल्या दालनात बोलवून घेतले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी सदस्य आर.जी. पाटील आदी उपस्थित होते. दिवेकर यांनी वर्क कॅलेंडर तयार केले आहे का? याबाबत तडवी यांना विचारणा केली असता अद्याप तयार केले नसल्याचे तडवी यांनी सांगितले यावर दिवेकर यांनी रागाच्या भरात अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप रफीक तडवी यांनी केला आहे. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे.तक्रार चुकीची व दुदैवी- शिवाजी दिवेकरया संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अशा प्रकारची तडवी यांची तक्रार चुकीची असून दुर्दैवी आहे. मी चुकीचे असे काही बोललो नाही. कामासंदर्भातच जाब विचारला. यावेळी इतर काही लोकही दालनात होते, असेही दिवेकर म्हणाले.
जळगाव जि.प.सीईओंकडून शिवीगाळ झाल्याची अधिकाऱ्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:34 PM
आयुक्तांना निवेदन
ठळक मुद्देकाम न केल्याने राग व्यक्त केल्याचा आरोपतक्रार चुकीची व दुदैवी- शिवाजी दिवेकर