चाळीसगाव : प्रभागातील कामांविषयी लेखी पत्र देऊनही पुर्तता होत नसल्यासह सभेच्या अजेंड्यावर विषय घेतांना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. असा तक्रारींचा पाढा सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीच वाचला. सक्शन व्हॅनच्या (सेफ्टी टँकमधील मैला स्वच्छ करण्याचे वाहन) दुरुस्तीत जुना पंप बसवून नविन पंपाचे बील सादर करण्यात आले असून याबाबत चौकशीची मागणी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी केली. बांधकाम समितीचे चेअरमन चंद्रकांत तायडे यांनी संबंधित ठेकेदाराशी झालेला मोबाईलवरील संवाद सभागृहात ऐकवला.गेल्या १९ रोजी तहकुब झालेली पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली. एकुण ५८ विषय सभेत चर्चिले गेले. यावेळी उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्यासह शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.नगरसेवकांनीच तक्रारींचा सूर आळवल्याने ही सभा दहा तास चालली. पालिका प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाविषयी देखील चर्चा झाली.स्वच्छ भारत योजनेतर्गत सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण हा केवळ दिखावा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. ६० लाखाची निविदा असतांना फुटकळ कामे केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण करणारी टीम बरोबर काम करीत नसून ज्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे, ती होत नाही. घंटागाडीवर एकच कर्मचारी असल्याने स्वच्छता कशी होईल. असा प्रश्न नगरसेविका संगीता गवळी, सविता राजपूत, चंद्रकांत तायडे यांनी उपस्थित केला.पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतात. स्टॉक रजिस्टर मागूनही उपलब्ध करुन दिले जात नाही. याच विभागात काही वर्षापासून जादा मटेरीयल पडून आहे. ते का मागविण्यात आले आहे. याचा खुलासा संबंधित कर्मचारी करीत नाही, असा मुद्दाही संजय रतनसिंग पाटील यांनी मांडला. जे कर्मचारी कामकाजात हयगय करीत असतील त्यांना पाठीशी न घालता नोटीस द्यावी. दोषी असल्यास कारवाई करावी. अशी मागणी राजेंद्र चौधरी यांनी केली.काम सुरु असल्याची नुसतीच फलकबाजीगेल्या काही महिन्यांपासून शहरात विविध प्रभागांमध्ये कामांचा शुभारंभ झाला. मात्र ही कामे सद्यस्थितीत बंद आहेत. नुसतेच उदघाटनाचे फलक लागले. ही कामे केव्हा सुरु होतील ? असा प्रश्न अरुण अहिरे यांनी उपस्थित केला.प्रभागांमध्ये बसविण्यात आलेल्या एलडी दिव्यांचा प्रकाश पडत नाही. अशा नागरिकांच्या तक्रारी असल्याचे वंदना चौधरी यांनी सांगितले.खरजई रोडचे काम निकृष्ट झाले असून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करुनही होत नसल्याची कैफियत रंजना सोनवणे यांनी मांडली. प्रभागात नागरिकांना बसण्यासाठी बाक बसविण्याची मागणी एक वर्षापासून करीत आहे. मात्र त्याची पुर्तता होत नाही. असेही सोनवणे यांनी सांगितले.दहा तास चालली सभासोमवारी दुपारी बारा वाजता सुरु झालेली सभा रात्री नऊ पर्यंत म्हणजे तब्बल दहा तास नॉनस्टॉप सुरु होती. गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात पालिकेची सभा पहिल्यांदाच इतक्या प्रदीर्घ वेळ चालली.नामकरणाविषयी तुर्तास निर्णय नाहीदरम्यान, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीला राष्ट्रपुरुषाचे नाव देण्याचा मुद्दाही गाजला. नामकरणाविषयी तुर्तास कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.याबाबत पुढील काळात सभागृहात सर्वानुमते विषय आल्यास निर्णय घेण्यात येईल, असे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले. या विषयावर नगरसेविकांनी आपापले मतप्रदर्शन केले. याविषयाकडे शहरवासियांचे लक्ष लागले होते.
चाळीसगाव पालिका सभेत नगरसेवकांनीच वाचला तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:03 AM
प्रभागातील कामांविषयी लेखी पत्र देऊनही पुर्तता होत नसल्यासह सभेच्या अजेंड्यावर विषय घेतांना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. असा तक्रारींचा पाढा सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीच वाचला. सक्शन व्हॅनच्या (सेफ्टी टँकमधील मैला स्वच्छ करण्याचे वाहन) दुरुस्तीत जुना पंप बसवून नविन पंपाचे बील सादर करण्यात आले असून याबाबत चौकशीची मागणी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी केली.
ठळक मुद्देसक्शन व्हॅन दुरुस्तीबाबत चौकशीची मागणी, दहा तास चालली सभापालिकेच्या सभेत ५८ विषयांवर चर्चा