शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

जळगावमध्ये अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत आचारसंहिता भंगची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 6:29 PM

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे.

कुंदन पाटील

जळगाव : संशोधन केंद्राला मान्यता देण्यासंदर्भात नियुक्त चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून भेट देणाऱ्या उमेदवाराकडून आचारसंहिता भंग झाली असून त्यांची वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळासाठी असलेली उमेदवारी रद्द करावी, अशी तक्रार डॉ.किशोर नीळकंठ बोरसे यांनी कुलगुरुंकडे केली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. दि. १० व ११ मार्च रोजी अभ्यास मंडळ अध्यक्ष पदाच्या निवडणुक होत आहेत. विद्यापीठ कायद्यानुसार एखाद्या अभ्यास मंडळाचे एकदा अध्यक्षपद उपभोगल्या नंतर लगेच त्या व्यक्तीस त्याच अभ्यास मंडळाचा अध्यक्ष होता येत नाही. याच आधारावर राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केलेल्या डॉ विजय तुंटे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. असे असतानाही तशातच कुलगुरू कार्यालयातर्फे विविध विषयांच्या तदर्थ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी डॉ.मधुकर भगवान पाटील यांची उमेदवारी आहे.  

उमेदवार असतानाही शिंदखेडा महाविद्यालयात संशोधन केंद्राला मान्यता देण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी  डॉ.मधुकर भगवान पाटील  यांची नेमणुक केली गेली. त्यानुसार शिंदखेडा महाविद्यालयास भेट दिली आणि कामकाज पाहून दि.६ एप्रिल रोजी अहवाल सादर केला. त्यांच्यासोबत सदस्य म्हणून डॉ.सुनील शरदचंद्र पाठक यांची नेमणूक झाली होती. डॉ.पाठक हे वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य असून ते मतदारदेखिल आहेत. त्यामुळे डॉ.पाटील यांनी केलेल्या आचारसंहिता भंगाविषयी गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यांचा अध्यक्षपदासाठी असलेला उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी डॉ.बोरसे यांनी केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव