मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील सुकळी व महालखेडा येथील सुरू असलेले पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे निमखेडी ब्रुद्रुक गणाचे पंचायत समिती सदस्य विकास पाटील यांनी केली आहे.पंचायत समिती सदस्य विकास पाटील यांनी मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुकळी व महालखेडा येथे पुलाचे काम चालू असून मी तिथे पाहण्यास गेलो असता प्रथमत: असे दिसून आले की, कामावर दहा ते पंधरा मजूर असून त्यांना कोणत्याही प्रकारचे सोशल डीस्टनसिंगचे नियम कामावर पाळण्यात येत नाही. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. तोंडावर मास्क नाही. तसेच कामावर टाकण्यात आलेली वाळू ही माती मिश्रित आहे. संपूर्ण पीसीसीमध्ये निकृष्ट दर्जाचा माल वापरला आहे. तसेच पीसीसीची उंची एक फुट असताना तीन इंचाची पीसीसी प्रत्यक्ष सदस्य पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी तपासली. याा कामाची चौकशी होत कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत म्हटलेले आहे२०१६ मध्येच हे काम मंजूर झाले. स्ट्रक्चरल आॅडिटनुसार या पुलाचे काम तातडीने करणे गरजेचे होते. कामाबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे. नियमांची काटेकोर अमलबाजावणी होणे क्रमप्राप्त आहे.-गणेश पाटील, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील पुलांच्या कामाबद्दल तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 5:26 PM
सुकळी व महालखेडा येथील सुरू असलेले पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठळक मुद्देपंचायत समिती सदस्याने केली तक्रारबांधकाम विभागाच्या अभियंत्यास दिले निवेदन