जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिल्या. तसेच वसुली, पाणीटंचाईचाही आढावा घेतला.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठीच्या निकषात बदल केल्याने पात्र शेतकºयांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. ३० जूनपर्यंत ही माहिती अपलोड होईल, यादृष्टीने जिल्हाधिकाºयांनी प्रयत्न करावेत, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी गुरूवारी व्हीडीओ कॉन्फरन्स बैठकीत दिले होते. त्याअनुषंगाने शुक्रवारी झालेल्या मासिक आढावा बैठकीत जिल्हाधिका-यांनी या योजनेची माहिती अपलोड करण्याची सद्यस्थिती जाणून घेत काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.टंचाईचाही आढावाजिल्हाधिका-यांनी सकाळी पाणीटंचाईचाही आढावा घेतला. या बैठकीला जि.प.चे गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी या गटविकास अधिकाºयांना प्रत्येक गावातील ५ हातपंपांच्या परिसरात जलपुर्नभरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतही जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. तसेच विंधनविहीरी व कूपनलिका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यांचे काम किती झाले? याबाबतही आढावा घेतला. तसेच सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांचीही आढावा बैठक जिल्हाधिका-यांनी घेतली.जुन्या फॉरमॅटनुसार ८६ टक्के उद्दीष्ट पूर्णप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पूर्वीच्या निकषांनुसार २ हेक्टरपर्यंतचेच शेतकरी पात्र होते. त्यानुसार जिल्ह्यातील १५०२ गावांपैकी १४९८ गावांमधील शेतकºयांची माहिती गोळा करण्यात आली असून त्यापैकी १४८९ गावातील २ लाख ५८ हजार ६२३ शेतकरी कुटुंबांची माहिती म्हणजेच ८६ .१४ टक्के माहिती अपलोड करण्यात आली आहे. मात्र आता शासनाने निकषात बदल केल्याने शेतकरी संख्येत वाढ झाली असून उर्वरीत माहितीही तातडीने अपलोड करावी लागणार आहे.
‘पीएम किसान’चे काम तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:04 PM