चाळीसगाव, जि. जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एरंडोल विभागाचा आंतरमहाविद्यालयीन युवारंग महोत्सव सोमवारी बी.पी.कला, एस.एम.ए.विज्ञान व के.के.सी.वाणिज्य महाविद्यालयात रंगणार आहे़. युवारंग महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून सहा रंगमंचावर २१ महाविद्यालयातील ४५६ युवा कलावंत आपला कलाविष्कार सादर करणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. अशा प्रकारचा युवारंग महोत्सव प्रथमच चाळीसगावी होत आहे.चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी साडे आठ वाजता आमदार उन्मेष पाटील यांच्याहस्ते होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव बी.बी.पाटील, युवारंग महोत्सवाचे समन्वय दिलीप रामू पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एरंडोल विभागातील जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा आणि धरणगाव येथील महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सांगता होईल.विविध कलाविष्कारयुवारंग महोत्सवासाठी धुळे रोडस्थित महाविद्यालयात विविध कलाविष्कारांसाठी सहा रंगमंच तयार करण्यात आले आहे. यात विडंबन नाट्या, भारतीय लोकगीते, काव्यवाचन, शास्त्रीय गायन व नृत्य, रांगोळी, इंस्टॉलिशन स्पॉट पेटींग याबरोबरच मूकनाट्य, समूह लोकनृत्य, सूगम गायन (भारतीय व पाश्चात्य), वादविवाद, वक्तृत्व, शास्त्रीय वादन (सूर वाद्य), शास्त्रीय गायन (ताल वाद्य), समुहगीत (पाश्चिमात्य), व्यंगचित्रे, फोटोग्राफी, मेहेंदी, चित्रकला, क्ले मा?डेलिंग आदी कलांचा समावेश असणार आहे. प्रा.डॉ. पंकजकुमार नन्नवरे हे महोत्सवाचे समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहे.चाळीसगाव येथे आंतरमहाविद्यालयीन युवारंग महोत्सव प्रथमच साजरा होत आहे. चाळीसगाव महाविद्यालयात तयारी पूर्ण झाली आहे. यामुळे येथील युवा कलेला प्रोत्साहन मिळणार आहे. आम्ही सर्व कलावंतांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.- डॉ. मिलिंद बिल्दीकर, प्राचार्य, चाळीसगाव महाविद्यालय
चाळीसगावातील युवारंग महोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 6:31 PM