अमळनेर : शिर्डी येथे झालेल्या ठाकूर कुटुंबीयांच्या तिहेरी हत्याकांडाबाबत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच पीडित दुटुंबाला शासनाकडून मदत व संरक्षण मिळावे यासाठी अमळनेर ठाकूर समाज मंडळातर्फे १७ जुलै प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले.शिर्डी येथे १३ जुलैला आदिवासी ठाकूर परिवारातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. याप्रसंगी ठाकूर समाज मंडळाचे राज्य सरचिटणीस रणजित शिंदे, अमळनेर अध्यक्ष दिलिप ठाकूर, जितेंद्र ठाकूर, प्रकाश वाघ, संजय ठाकूर, नथ्थू वानखेडे, दिलीप वानखेडे, शांताराम ठाकूर, अनिल ठाकूर, गुणवंत वाघ, किरण ठाकूर, नारायण वानखेडे, अनिल सोमा ठाकूर, मीना ठाकूर, अपेक्षा पवार, बेबी वानखेडे, नारायण वानखेडे, देविदास ठाकूर, सुखदेव ठाकूर, साहेबराव पवार, विजय ठाकूर, गजाजन ठाकूर, काशिनाथ ठाकूर, यशवंत सुर्यवंशी, निलेश वाघ, बाळकृष्ण ठाकूर, अरुण ठाकूर, प्रकाश ठाकूर, संजय सुर्यवंशी, राजेंद्र ठाकूर, रामदास ठाकूर, शालिक ठाकूर, हिंमत ठाकूर, लोटन ठाकूर आदींनी सदर घटनेचा निषेध नोंदविला.
शिर्डी येथील हत्याकांडप्रकरणी अमळनेरात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 6:49 PM