आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - सातबारा कोरा करावा, हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी १ जून पासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.संपामुळे चोपडा येथील बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.जळगाव व चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाचा लिलाव नेहमीप्रमाणे झाला.संप काळात ५ जूनला धिक्कार दिवस पाळला जाणार असून जळगाव येथे जिल्हाधिकाºयांना शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचे धिक्कार करणारे निवेदन देण्यात येईल. ६ जूनला मंदसौर येथील शेतकरी व धर्मा बाबा यांना चोपडा येथे श्रद्धांजली वाहण्यात येईल. ८ जूनला काळ्या फिती लावून शेतकरी असहकार करतील. ९ जूनला लाक्षणिक उपोषण जिल्ह्यात काही ठिकाणी होईल. १० जून ला भारत बंद चे आयोजन केले असून चोपडा साखर कारखान्याकडून पैसे मिळणेसाठी चोपडा येथे रास्ता रोको व शिंगाडे मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे. या संदर्भात जिल्ह्यात एस. बी. पाटील, विवेक रणदिवे, सुभाष पाटील, सचिन पाटील, मेहमूद बागवान, गोकुळ बोरसे, सुरेश पाटील, डॉ. डी. डी. बच्छाव, विनोद देशमुख, संजय पवार यांच्यासह शेकडो शेतकरी संपासाठी प्रयत्नशील आहेत.
जळगाव जिल्ह्यात शेतकरी संपाला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:22 PM
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - सातबारा कोरा करावा, हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी १ जून पासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.संपामुळे चोपडा येथील बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.जळगाव व चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाचा लिलाव नेहमीप्रमाणे झाला.संप काळात ५ ...
ठळक मुद्देचोपडा येथील बाजार समितीमध्ये शुकशुकाटतहसीलदारांना निवेदन