ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.5- गिरणा परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर चाळीसगाव आणि पाचोरा येथे रस्तारोको मुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
चाळीसगाव येथे सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या वतीने व्यापा:यांना बंदची हाक देण्यसाठी सोमवारी सकाळी 9 वाजता रेल्वे स्टेशनपासून रॅली काढली. 11 वाजता सिग्नल चौकात आल्यावर रास्तारोको करण्यात आला. अर्धा ते पाऊण तास या आंदोलनामुळे चारही वाजुची वाहतूक ठप्प झाली. यावेळी कजर्माफी करावी याबाबत घोषणा दिल्या. याचबरोबर बाजारसमितीही बंद होती. किरकोळ भाजी विक्रेते मात्र गावात दिसून आले. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
पाचो:यात शिवसेनेचा रास्ता रोको आणि विविध पक्षांचा बंद
पाचोरा येथे विविध पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेतला तर शिवसेनेने बंद सोबतच रास्तारोकोही केला. यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली तर मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद होती.
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी पाचोरा येथे शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले गेले. आमदार किशोर पाटील यांनी रस्त्यावर कार्यकत्र्यांसह ठिय्या दिला. महाराणा प्रताप चौकात केल्या गेलेल्या आंदोलनात जळगाव, भडगाव, चाळीसगावकडून येणा:या वाहनांना अडविल्याने काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. संतप्त शेतक:यांनी कांदा, बटाटे, टमाटे, टरबूज, लिंबू, ढेमसे रस्त्यावर फेकून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या .
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, या पक्षांसह किसान क्रांती , पाचोरा तालुका व्यापारी महामंडळ, सराफ असोसिएशन ,भाजीपाला व फळ विक्रेते असोसिएशन , फर्टिलाइजर कृषि केंद्र दुकानदार संघटना, शेतकरी संघटना, मराठा सेवा संघ, भूमिपुत्र शेतकरी संघटना , संभाजी ब्रिगेड , राष्ट्रीय शेतकरी संघटना , संत सेना नाभिक मंडळ, आरपीआय (आठवले गट), जय मल्हार सामाजिक संघटना, पंचशील सामाजिक संघटना अशा विविध संघटनांनी बंदचे आवाहन केले होते आणि व्यापारी बांधवांनी देखील आपले दुकाने बंद करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
भडगाव येथेही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठेत बहुतांश दुकाने बंद होती इतर ठिकाणी मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कजगाव येथेही बंद पाळला. रस्त्यावर दूध ओतून शेतक्यांनी संताप व्यक्त केला.