शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

कोथळी येथे संत मुक्ताबाई पादुका स्वस्थळी गाभाऱ्यात विराजमान करून आषाढी वारीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 4:24 PM

यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.

ठळक मुद्देपरंपरेच्या उपासकामुळेच पालखी सोहळा टिकून हभप रवींद्र हरणे महाराजपूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।। घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.दरवर्षी संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागातून भव्य आणि दिव्य साजरा होतो. दिंडी स्पर्धांमध्ये दिडशेवर भजनी मंडळ सहभागी होत असतात, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अनंत अडचणी येऊनही केवळ परंपरेच्या उपासकामुळेच ही परंपरा अखंडित राहिल्याचे याप्रसंगी रवींद्र हरणे महाराज यांनी सांगितले.तब्बल ५६ दिवसांनी आज परंपरागत तिथीनुसार नवीन मंदिर येथून पालखी मुख्य समाधी मंदिर कोथळी येथे आणण्यात आले. त्यावेळी गुलाबपुष्प वर्षावात स्वागत करण्यात आले.नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी पालखी पूजन केले. पादुकांना पंचामृताने अभिषेक व आरती विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक केली. मुक्ताबाई-मुक्ताबाई जयघोषात संत मुक्ताबाई पादुकांना गाभाºयात विराजमान करण्यात आले.पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।।घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।या अभंगाप्रमाणे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याचे कीर्तन केले व आषाढी वारीची सांगता झाली. मंदिर परिसर रांगोळी तोरणे पताका लावून सजविला होता.यावेळी संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार चंद्रकात पाटील, तहसीलदार श्याम वाडकर, नरेंद्र नारखेडे, योगेश भावसार, कोथळी उपसरपंच उमेश राणे, बारसू खडसे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विनायक पाटील, श्रीकांत पाटील, विशाल सापधरे, सम्राट पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक संतोष मराठे, अन्नदाते नीना काठोके तसेच मुक्ताई फडावरील महाराज मंडळी व भाविक उपस्थित होते.हरणे महाराजांचे कीर्तनआपल्या कीर्तनात ह.भ.प. रवींंद्र हरणे महाराज यांनी परंपरेचे उपासकांनामुळेच पालखी सोहळा टिकून आहे. सोहळा किंवा मंदिर उभारणे कठीण नाही. परंतु ती परंपरा पुढे चालू ठेवणे हे कठीण असते. संत मार्गाने अंधानुकरण केले आणि संतांच्या विचारानुसार कृती केली तरी जीवन सफल होते. जीव हा अपूर्ण आहे म्हणून पूर्णत्व असलेल्या भगवंत रुपाकडे आपण ध्यान लावले पाहिजे आणि प्रसाराचे पृथक्करण करून सार असलेल्या भगवंतामध्ये आपण लिन झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर