जळगाव: गाळे कराराचा तिढा सोडविण्याऐवजी गाळेधारकांना अडचणीत आणले जात असल्याचा आरोप करीत त्या निषेधार्थ सुमारे १४ गाळेधारकांनी मंगळवारी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनस्थळी सामूहिक मुंडन केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यास गाळेधारकांसह शहरातील व्यापाºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शहरातील २० मार्केटमधील गाळे कराराच्या विषयात गाळेधारकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच योग्य दराने प्रिमियम आकारून दीर्घ मुदतीच्या ९९ वर्षांच्या कराराने गाळे देण्याच्या मागणीसाठी जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेतर्फे मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला. त्यानंतर बुधवार २१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे करण्यात आले. बुधवारी सकाळपासून गाळेधारकांनी या ठिकाणी उपस्थिती दिली. त्यामुळे हा रस्ता गर्दीने गजबजून गेला होता. लाऊडस्पीकरवरून घोषणाबाजी तसेच गाळेधारकांना मार्गदर्शन सुरू होते. आंदोलनकर्त्यांसाठी लांबलचक मंडप टाकण्यात आला होता. ‘व्यापारी एकता जिंदाबाद’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशी घोषणाबाजी चालली होती. दिवसभर विविध सामाजिक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गाळेधारकांना आपला पाठिंबा जाहीर केला. गाळेधारकांच्या हितासंबंधी जोपर्यंत राजकीय पदाधिकारी व प्रशासन योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा गाळेधारकांच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिला. व्यापाºयांच्या हिताचा निर्णय घेणाºयांचीच सत्ता महापालिकेत आणू, असेही यावेळी सांगण्यात आले.१४ गाळेधारकांनी केले सामूहिक मुंडनधरणे आंदोलन सुरू असतानाच दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही गाळेधारकांनी प्रशासनाच्या निषेधार्थ सामूहिक मुंडन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ गाळेधारकांनी या ठिकाणी सामूहिक मुंडन केले. त्यात विलास सांगोरे, पंकज मोमाया, सुनिल बाविस्कर, राधेश्याम शिंपी, दिलीप राजपाल, सतीश गेही, योगेश बिर्ला, पुरूषोत्तम बाविस्कर, नंदू सोनार, यशवंत खडके, अशोक होतचंदाणी, आनंदा मेटकर, किशोर पाटील, पांडूरंग कासार यांचा समावेश आहे.तर भाजपा नगरसेविका कंचन बालाणी देणार राजीनामाभाजपच्या कंचन प्रकाश बालाणी यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट देऊन पाठींबा दिला. २३ रोजीच्या महासभेत गाळेधारकांच्या हिताविरूध्द प्रस्ताव केला गेल्यास त्यास तीव्र विरोध करुन राजीनामा देणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.----भाजप नगरसेवकांनी गाळेधारक विरोधी ठरावाला विरोध करावाभाजपाचे मनपातल गटनेते सुनील सुनील माळी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन भाजपाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यावेळी गाळेधारकांच्या विरोधात कोणताही ठराव आल्यास त्याला भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महासभेत उपस्थित राहून विरोध केला पाहिजे, अशी मागणी गाळेधारकांनी केली. त्यास माळी यांनी होकार दर्शविला.---आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहनमहाराष्ट्राच्या दृष्टीने गाळेधारकांचे निर्णायक आंदोलन आहे. जळगावसारखी परिस्थिती भविष्यात अन्य महापालिका क्षेत्रातही उद्भवणार आहे. त्यामुळे आंदोलन थांबवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. उल्हास साबळे यांनीही पाठींबा दर्शविला.-----आत्महत्येशिवाय पर्याय नाहीयावेळी गाळेधारकांनीही मनोगत व्यक्त केले. रोहित शर्मा, फुले मार्केट मधील नसीर नजीर पिंजारी व सोनाली कदम (दुकान कामगार) यांनी आपल्या भावना मोकळ्या करताना भावविवश होवून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले.--केसांचा लिलाव करून कर्ज फेडामनपा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी १४ गाळेधारकांनी मुंडण केले. या केसांचा आहेर स्वीकारून त्याचा जाहीर लिलाव करावा आणि येणाºया पैशातून गाळेधारकांवर होणाºया कर्जाची फेड करावी, अशी मागणी करण्यात आली.-----विविध क्षेत्रातून मिळतोय पाठिंबाधरणे आंदोलनास अनेक राजकीय, सामाजिक संघटना व मान्यवरांनी उत्स्फूर्त पाठींबा जाहीर केला. केशव स्मृती सेवासंस्था समुहाचे अध्यक्ष तथा उद्योजक भरत अमळकर यांनी प्रशासनाने व मनपाने योग्य तो गाळेधारकांच्या हिताचा निर्णय घेऊन मागील सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेधारकांचा प्रश्न त्वरित सोडवावा. गाळेधारकांना अपेक्षित असणारा माझा पाठिंबा हा त्यांच्या सोबत सदैव राहील याची ग्वाही दिली. महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे सदस्य व व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र ही राज्यस्तरीय व्यापाºयांची संघटना जळगावच्या गाळेधारकांच्या पाठीशी उभी आहे. देशभरात सात लाख व्यापारी सदस्य असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स ही व्यापारी संघटनाही गाळेधारकांची समस्या राष्ट्रीय स्तरावर उचलणार आहे, असे सांगितले. ललित बरडिया यांनी फेडरेशन आॅफ असोसिएशन, महाराष्ट्र (फॅम) अध्यक्ष विनेश मेहतांसह गाळेधारकांसोबत असून, याप्रश्नी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. डॉ. राजेंद्र भालोदे, अशोक नागराणी यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉ. अभय गुजराथी यांनी पाठींबा जाहीर केला. याखेरीज भाजपा ओबीसी मोर्चातर्फे सचिव पूनम खैरनार व पदाधिकारी, सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियनचे मनोज चौधरी, ललीत शर्मा, भाजपा महानगर भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष सुरेश भाट, खाविआ नगरसेवक अजय पाटील, महानगर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक नरेंद्र पाटील, अॅड.विजय भास्करराव पाटील, जळगाव शहर पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष लक्ष्मणदास अडवाणी, कोल्हापूर किराणा मर्चंट असोसिएशनचे सचिव बबन महाजन, भुसावळ शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक नागरणारी, प्रकाश दर्डा, महाराष्टÑ राज्य शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक संघटना पुणेचे जळगाव जिल्हाध्यक्ष व्ही.एम. चव्हाण, उद्योजक गनी मेमन, चंदन मलीक, शिवराम पाटील आदींनी पाठींबा दिला आहे.