जळगाव : काेविड रुग्णालया समोर शनिवारी बाजार भरल्याने मोठी कोंडी झाली होती. रुग्णालयात जाणारा रस्ताही जवळपास बंदच झाला होता. दहा ते पंधरा मिनिटे या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली होती. मात्र, लक्ष द्यायला कोणी नसल्याने मोठे गोंगाटाचे वातावरण या ठीकाणी झाले होते.
पार्कींग बदलविणार
जळगाव : कोविड रुग्णालयात नॉन कोविड झाल्यानंतर वाहने पार्क करण्यासाठी निवासस्थानच्या मागच्या बाजुला व्यवस्था करण्यात येणार असून रुग्णालयाच्या समोर कुठलीही गर्दी होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नॉन कोविडचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
रुग्ण पाचेशेच्या खालीजळगाव : सक्रीय रुग्णांची संख्या शनिवारी घटून ४८० वर पोहोचली आहे. यात ३३२ रुग्णांना कसलीही लक्षणे नसून १४८ रुग्णांना लक्षणे असल्याची माहिती प्रशासनाने शनिवारच्या अहवालामध्ये दिलेली आहे. ही संख्या पाचशेवर पोहचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.
रुग्णालयात सपाटीकरण
जळगाव : कोविड रुग्णालयात काही भागात सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रुग्णालयातील मंदिराजवळ शनिवारी हे काम सुरू होते. यासह शासकीय निवासस्थानांच्या मागील बाजुसही कचरा काढून त्या ठिकाणीही सपाटीकरण करण्यात आले आहे.
बाहेरील १ बाधित
जळगाव : इतर जिल्ह्याती एक रुग्ण ॲन्टीजन टेस्टमध्ये बाधित आढळून आला आहे. बाहेरील जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४६६ वर पोहोचली असून त्यापैकी ४५४ रुग्ण बरे झालेले आहेत तर १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मध्यंतरी या नोंदणीवरून गोंधळ निर्माण झाला होता.
प्रमुख डॉक्टर सुटीवर
जळगाव : कोविडची रुग्णसंख्या कमी असल्याने कोविड रुग्णालयाती प्रमुख डॉक्टर सुटीवर गेले असून सोमवारनंतर सर्व डॉक्टर कर्तव्यावर रुजू होणार आहे. दरम्यान, त्यानंतर नियोजित सर्व कामांना सुरूवात होणार आहे. त्या आधी नॉन कोविडबाबत प्राथिमक नियोजन केले जात आहे.