लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड नियंत्रणासह विविध बाबीत मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्फे काँग्रेसभवनासमोर रविवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या.
मोदी सरकारला अपयशाचे सात वर्षे पूर्ण झाले याच सात वर्षात मोदी सरकारने देशाला डबघाईस टाकल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे हे आंदोलन करण्यात आले.
कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयश, पेट्रोलचे डिझेलचे भाव आणि वाढती महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेराजगारी, याबाबत आरोप करून या मुद्दयांवरून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज चौधरी, श्याम तायडे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे, जिल्हा जनरल सेक्रेटरी जमील शेख, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, सोशल मीडिया प्रमुख प्रमोद घुगे, भिकन सोनवणे, समाधान पाटील, प्रदीप सोनवणे, जगदीश गाडे, दीपक सोनवणे, देवेंद्र मराठे, पी. जी पाटील, गोकुळ चव्हाण, राहुल गरुड, वैभव पाटील, सचिन माळी, ज्ञानेश्वर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.