यावल : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या यावल तालुक्यास गेल्या १० वर्षापासून भाजपाने खिंडार पाडण्यास सुरवात करून स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थावर सत्ता काबीज केली आहे. दहा वर्षातील तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सत्ता फलकावर नजर टाकली तर भाजपा-काँग्रेस पाठशिवणीचा खेळ खेळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपा-काँग्रेस कमी अधिक प्रमाणात समसमान आहे. त्यामुळे तालुक्यावर कोणत्या नेत्याचा अथवा कोणत्या पक्षाचा करिष्मा आहे असे म्हणता येणार नाही. विधानसभा पुर्नरचनेत यावल विधानसभा मतदार संघ लुप्त झाला आहे. तालुका दोन मतदार संघात विभागला आहे. तालुक्याचा यावल शहरासह पूर्व भाग रावेर विधानसभा मतदार संघात तर पश्चिम भाग चोपडा विधानसभा मतदार संघात समाविष्ठ झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील सत्तेचे राजकारण भाजपा-सेनेच्या हाती दिसत आहे. पंचायत समिती, बाजार समिती भाजपा सेनेच्या ताब्यात आहे. तालुक्यात पाच जि.प. गट आहेत पैकी तीन भाजपाकडे तर दोन गट काँग्रेसकडे आहेत. पं. स. च्या १० गणापैकी पाच भाजपा तर चार काँग्रेसचे सदस्य आणि एका गणात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती.भाजपाच्या पाच सदस्यांपैकी व्हीपचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून एक सदस्य अपात्र आहे. जि.प. व पं. स. सदस्याचां विचार करता सध्या भाजपा सरशी असली तरी काँगे्रस त्या पाठोपाठ आहेच. त्यामुळे कधी या संस्था भाजपाच्या ताब्यात तर कधी काँग्रेसच्या ताब्यात राहिलेल्या आहेत.भाजपाने रोवल पायमतदार संघाच्या पुर्नरचने आधी तालुक्यात काँग्रेसचे अधिपत्य होते.मात्र विधानसभा पुर्नरचनेनंतर भाजपाने हळूहळू तालुक्यात पाय रोवण्यास सुरवात करून आता आपले पाय घट्ट रोवले आहेत.
सत्तेसाठी काँग्रेस व भाजपाचा पाठशिवणीचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:57 AM