स्वबळावर लढण्यावर काँग्रेस ठाम; अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड अपेक्षित- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 08:31 AM2021-06-24T08:31:57+5:302021-06-24T08:32:23+5:30

पटोले म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.

Congress insists on fighting on its own; Election of Assembly Speaker is expected in the convention- Congress Leader Nana Patole | स्वबळावर लढण्यावर काँग्रेस ठाम; अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड अपेक्षित- नाना पटोले

स्वबळावर लढण्यावर काँग्रेस ठाम; अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड अपेक्षित- नाना पटोले

Next

जळगाव : आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढेल, त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

पटोले म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी काम देखील सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विचारले असता ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र ही निवड होण्यासाठी सर्व आमदार सभागृहात असणे अपेक्षित असते. गेल्या अधिवेशनात अनेक आमदार कोविड संसर्गामुळे येऊ शकले नाहीत. 

केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, मोदींनी ठरवले तर कोरोनाचा नायनाट होईल. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. 
केंद्र सरकारने राज्य सरकारचे जीएसटीचे पैसे थकवले आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर आर्थिक प्रश्न आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी स्वबळाचाच नारा दिला. तत्पूर्वी  फैजपूर येथील ऐतिहासिक भूमीतून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. केंद्र सरकार इंग्रजांपेक्षाही जुलमी असल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: Congress insists on fighting on its own; Election of Assembly Speaker is expected in the convention- Congress Leader Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.