शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

काँग्रेस-राष्ट्रवादीला चक्क भोपळा, सेनेला पछाडत भाजपच सत्ताधीश 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 8:25 PM

राज्यातील दोन महापालिकांच्या निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारल्याचे दिसत आहे. जळगाव महापालिकेत 57 जागांवर तर सांगली महापालिकेत 41 जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

जळगाव - राज्यातील दोन महापालिकांच्या निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारल्याचे दिसत आहे. जळगाव महापालिकेत 57 जागांवर तर सांगली महापालिकेत 41 जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असलेल्या सांगली महापालिकेतही भाजपने मोठा विजय मिळवला आहे. गतवर्षीच्या 6 जागांवरुन थेट 41 जागांवर भाजपला विजय मिळाला. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला जळगावमध्ये भोपळाही फोडता आला नाही. जळगावमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला एकही जागा जिंकला आली आहे.

राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मोठा धक्का देत भाजपानं जळगाव महानगरपालिकेवर झेंडा फडकवला आहे. तर, काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या सांगली-मिरज-कुपवाडमध्ये दणदणीत विजय मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जळगाव मनपाच्या ७५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३०३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. भाजपा व शिवसेनेमध्ये काट्याची लढत रंगण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित मनपावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. २००३ मध्ये सुरेशदादा जैन हे राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीला ३४ जागा मिळाल्या होत्या. तर यंदा मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान ८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला झटका दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी करून ६२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, या आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. तर शिवसेनेला केवळ 15 जागा जिंकता आल्या आहेत.

जळगाव महापालिका प्रचारासाठीही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली नव्हती. मात्र, 2019 साली महाराष्ट्र काबिज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला एकही जागा न मिळाल्याने आणि सांगलीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठे परिश्रम घ्यावे लागणार असल्याचेच दिसून येते. दरम्यान, सांगली महापालिकेत शिवसेनेला एकही जागा जिंकला आली असून भाजपने 41 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक