अमळनेर : तालुका व शहर व युवक काँग्रेस कमिटीतर्फे डिझेल-पेट्रोल व गॅस दरवाढीविरोधात आंदोलन छेडण्यात आले. शहरातील दोन पेट्रोलपंपांवर आंदोलन करत केंद्र सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा धिक्कार केला.
पेट्रोल-डिझेल भाववाढीमुळे वाहने चालवणे, वापरणे परवडत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी दोन चाकी व चारचाकी वाहने एका पेट्रोलपंपापासून दुसऱ्या पेट्रोल पंपावर ढकलत नेले व जनसामान्यांचे आंदोलनासंदर्भात लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, किसान काँग्रसचे सुरेश पाटील, बी. के. सूर्यवंशी, तुषार संदानशिव, हर्षल पाटील, रज्जाक शेख, तौसिफ तेली, सईद तेली, युवक अध्यक्ष महेश पाटील, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, प्रा. किरण पाटील, प्रा. स्वप्निल पवार, प्रा. दीपक पवार, प्रा. पंकज तायडे, प्रा. गोपाल पाटील, प्रा. विलास पाटील, प्रा. योगेश वाणी, प्रा. अमोल पाटील, डाॅ. रवींद्र पाटील, डॉ. दीपक पाटील, डाॅ. आत्माराम पाटील, उमेश पाटील, गिरीश पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
===Photopath===
100621\10jal_1_10062021_12.jpg
===Caption===
काॅंग्रेसतर्फे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन