पाचोरा काँग्रेसने येथील तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईच्याविरोधात आंदोलन केले. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहर अध्यक्ष ॲड. अमजद पठाण, ज्येष्ठ पदाधिकारी माजी पं. स. सभापती शेख शेख फकीरा, राजेंद्र महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, नंदकुमार सोनार, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, बाजार समिती प्रशासक प्रा. एस. डी. पाटील, महिला तालुकाध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा महिला पदाधिकारी मनीषा पवार, संगीता नेवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, प्रकाश चव्हाण, जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष इरफान मनियार, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ. फिरोज शेख, इस्माईल तांबोळी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले, शीला सूर्यवंशी, दीपक पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, समाधान पाटील, गणेश पाटील, संजय सोनार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
===Photopath===
220621\22jal_3_22062021_12.jpg
===Caption===
तहसील कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने