काँग्रेसचे नेते पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधांवर; प्रदेशाध्यक्षांचे आदेश, जिल्हानिहाय सोपविली जबाबदारी

By सुनील पाटील | Published: December 2, 2023 02:27 PM2023-12-02T14:27:30+5:302023-12-02T14:28:31+5:30

शेतावर गेल्यावर तेथील फोटो व दौऱ्याचा अहवालही प्रदेशाध्यांनी मागितला आहे.

Congress state president Nana Patole has ordered Congress leaders to meet the affected farmers | काँग्रेसचे नेते पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधांवर; प्रदेशाध्यक्षांचे आदेश, जिल्हानिहाय सोपविली जबाबदारी

काँग्रेसचे नेते पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधांवर; प्रदेशाध्यक्षांचे आदेश, जिल्हानिहाय सोपविली जबाबदारी

जळगाव : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊन व गारपीटमुळे कापूस, तूर, सोयीबीन, केळी, द्राक्ष, डाळींब, संत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी सर्वच कॉग्रेस नेत्यांनी थेट शेतकऱ्यांच्या जाऊन पिकांची पाहणी करावी असे निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असून प्रत्येक नेत्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे.

शेतावर गेल्यावर तेथील फोटो व दौऱ्याचा अहवालही प्रदेशाध्यांनी मागितला आहे. आधीच यदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना आता परत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे उभे पीके नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केल्यावर नुकसान भरपाईबाबत सरकारला जाब विचारता येईल. या स्थितीत पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पटोले यांनी सर्वच नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यात विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे.

अशी आहे जिल्हानिहाय नेत्यांची जबाबदारी
जिल्हा    नेते
नाशिक : बाळासाहेब थोरात
नांदेड :  अशोक चव्हाण
पुणे :  पृथ्वीराज चव्हाण
नागूपर : विजय वडेट्टीवार
जळगाव : संजय राठोड
नंदूरबार : डॉ.उल्हास पाटील
धुळे : पद‌्माकर वळवी
ठाणे : आरिफ खान
संभाजी नगर : बसवराज पाटील
लातूर : प्रणिती शिंदे
अहमदनगर : कुणाल पाटील
वर्धा : सुनील केदार
अकोला : यशोमती ठाकूर
सातारा : सतेज पाटील
सोलापूर : विश्वजीत कदम
चंद्रपूर : प्रा.वसंत पुरके
बुलडाणा : सुनील देशमुख
गडचिरोली : सुभाष धोटे
सांगली : संग्राम थोपटे
परभणी : अमर राजूरकर
गोंदिया : अभिजीत वंजारी
अमरावती : रणजित कांबळे
धाराशीव : राजेश राठोड
यवतमाळ : अमित झनक
बीड : धीरज देशमुख
कोल्हापूर : रवींद्र धंगेकर
पालघर : हुसेन दलवाई
रायगड : सुरेश टावरे
भंडारा : नाना गावंडे
सिंधुदुर्ग : हुस्नबानो खलिफे
वाशिम : विरेंद्र जगताप
हिंगोली : विजय खडसे
जालना : नामदेव पवार

Web Title: Congress state president Nana Patole has ordered Congress leaders to meet the affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.