जळगाव : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊन व गारपीटमुळे कापूस, तूर, सोयीबीन, केळी, द्राक्ष, डाळींब, संत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी सर्वच कॉग्रेस नेत्यांनी थेट शेतकऱ्यांच्या जाऊन पिकांची पाहणी करावी असे निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असून प्रत्येक नेत्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे.
शेतावर गेल्यावर तेथील फोटो व दौऱ्याचा अहवालही प्रदेशाध्यांनी मागितला आहे. आधीच यदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना आता परत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे उभे पीके नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केल्यावर नुकसान भरपाईबाबत सरकारला जाब विचारता येईल. या स्थितीत पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पटोले यांनी सर्वच नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यात विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे.
अशी आहे जिल्हानिहाय नेत्यांची जबाबदारीजिल्हा नेतेनाशिक : बाळासाहेब थोरातनांदेड : अशोक चव्हाणपुणे : पृथ्वीराज चव्हाणनागूपर : विजय वडेट्टीवारजळगाव : संजय राठोडनंदूरबार : डॉ.उल्हास पाटीलधुळे : पद्माकर वळवीठाणे : आरिफ खानसंभाजी नगर : बसवराज पाटीललातूर : प्रणिती शिंदेअहमदनगर : कुणाल पाटीलवर्धा : सुनील केदारअकोला : यशोमती ठाकूरसातारा : सतेज पाटीलसोलापूर : विश्वजीत कदमचंद्रपूर : प्रा.वसंत पुरकेबुलडाणा : सुनील देशमुखगडचिरोली : सुभाष धोटेसांगली : संग्राम थोपटेपरभणी : अमर राजूरकरगोंदिया : अभिजीत वंजारीअमरावती : रणजित कांबळेधाराशीव : राजेश राठोडयवतमाळ : अमित झनकबीड : धीरज देशमुखकोल्हापूर : रवींद्र धंगेकरपालघर : हुसेन दलवाईरायगड : सुरेश टावरेभंडारा : नाना गावंडेसिंधुदुर्ग : हुस्नबानो खलिफेवाशिम : विरेंद्र जगतापहिंगोली : विजय खडसेजालना : नामदेव पवार