जळगाव : जिल्हा मनियार बिरादरी ची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षतेखाली शिरसोली येथील नशेमन कॉलनी येथे पार पडली या सभेत एकूण १२ विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
या बैठकीत बिरादरी च्या नियोजित खुल्या भूखंडावरील बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. सभासदांची यादीला मंजुरी सह या वर्षी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यावेळी तीन नवदाम्पत्य आणि त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. बोहरा समाजाचे युसुफ मकरा, मेमन बिरादरीचे हनीफ सत्तार मेमन आणि मुस्लिम बिरादरीचे रहीम रज्जाक मलिक यांनीही या दाम्पत्याचा गौरव केला आणि त्यांना भेटवस्तु दिल्या.
वार्षिक सभेत फारुक शेख, सैयद चांद, हारून शेख, ताहेर शेख, आबिद शेख, अल्ताफ शेख, मुश्ताक शेख, रऊफ टेलर(जळगाव), अजिज शेख(पाळधी), हकीम चौधरी(मुक्ताईनगर), असलम शेख(साकळी), शब्बीर शेख( अडावद), मुनाफ शेख (जामनेर), शफी शेख( कजगाव ), साबीर शेख( भुसावळ), इक्बाल शेख( धरण गाव), नबी मिस्तरी, इब्राहिम बिस्मिल्ला, ( शिरसोली) रियाज शेख, इस्माईल शेख, अबुजर शेख,करीम शेख( नशिराबाद) ,शब्बीर चुडीवाला( चाळीसगाव) हाजी दगडू शेख( भडगाव) हारून रशीद( बोरनार)अर्षद शेख रफिक ( बोदवड) यांनी सभेत चर्चा केली
हाजी इब्राहिम, खलील शेख, करीम शेख, शाकीर शेख, तौफिक शेख, गुलाम शेख, समीर शेख, आबीड शेख, सलीम शेख व साबीर शेख यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.