या लसीकरण केंद्राचा उद्देश सांगताना नगराध्यक्षांनी १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण या ठिकाणी होणार आहे, यासाठी अद्ययावत संगणक कक्ष तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
केंद्रावर १२०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, असे नियोजन केले आहे. आवश्यकतेनुसार केंद्रावर भविष्यात २००० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच पालिकेच्या अधिनस्त शहरातील उर्वरित दवाखान्यांमध्ये नागरिकांना कोविड आजाराव्यतिरिक्त इतर आजारांचे, गरोदर बायकांची तपासणी, लहान मुलांचे नियमित लसीकरण, क्षयरोग, मलेरिया आणि कुष्ठरोग अनेक आरोग्य सुविधा नियमितपणे सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातून या केंद्रावरील लसीकरणाचा ताण कमी करण्याच्या हेतूने या ठिकाणी ज्या नागरिकांनी ऑनलाइन कोविड लसीकरणासाठी नोंदणी केलेली असेल अशाच नागरिकांसाठी लसीकरण चालू ठेवण्यात येईल.
कार्यक्रमस्थळी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचे न. पा. कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या कोविडच्या लसीकरणाच्या दृष्टीने सर्व नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नव्याने स्थापन केलेले द. शि. विद्यालय लसीकरण केंद्र, असे एकत्रित मिळून जास्तीत जास्त प्रती दिवस ३००० लसीकरण करण्याचे नियोजन केल्याबाबत विशेष अभिनंदन केले.
१८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या पाहता आरोग्य विभागाने नियोजन केल्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत भुसावळ शहरामधील लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने केलेले नियोजन पूर्णत्वास जाईल.
टोकनवरील वेळवाटप स्थळ/ केंद्र
सकाळी ९ ते १०- बद्रीप्लॉट दवाखाना
सकाळी १० ते ११- महात्मा फुलेनगर दवाखाना
सकाळी ११ ते १२- वरणगावरोड (शिवदत्तनगर) दवाखाना
दुपारी १२ ते १- यावलरोड न. पा. दवाखाना
दुपारी २ ते ३- खडकारोड दवाखाना
दुपारी ३ ते ४- बद्रीप्लॉट दवाखाना
दुपारी ४ ते ४- यावलरोड दवाखाना व महात्मा फुलेनगर दवाखाना
नागरिकांनी नमूद दवाखान्यांतून टोकन घेऊन द. शि. विद्यालय (डी. एस. हायस्कूल) या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी टोकनवरील नमूद वेळेनुसार उपस्थित राहावे. आपली लस घेऊन झाल्यावर हे टोकन हे सिस्टरांकडे जमा करणे आवश्यक आहे, अशी माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांनी दिली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर, डॉ. संदीप जैन, डॉ. तौसिफ खान, डॉ. आतिया खान, डॉ.अर्शिया शेख, डॉ.उज्ज्वला भंगाळे, डॉ. अश्विनी वर्मा, औषध निर्माता प्रकाश तळेले व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.