ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.23- महामानव डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यप्रदेशातील महू येथील निघालेल्या संविधान रथाद्वारे संविधानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात संविधान हा विषय घेतला जावा यासाठी हा रथ काढण्यात आल्याची माहिती व्हिजन ऑफ बाबासाहेब वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवीन भारतीय यांनी येथे दिली़
शहरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला़ ते म्हणाले की, संविधानाचा विषय अभ्यासक्रमात आल्यानंतर युवकांना हक्क व कर्तव्याची जाण होईल़ देशभरात 30 कोटी संविधान वाटपाचे उद्दिष्ट आह़े नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक रवींद्र खरात, सुशीला भारतीय, लक्ष्मण जाधव, रमेश अंभोरे, दादा निकम, प्रशांत नरवाडे आदींची उपस्थिती होती़