शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

संविधान जागर रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 9:52 PM

जळगाव : शहर आणि परिसरात संविधान दिन उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळांमध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व ...

जळगाव : शहर आणि परिसरात संविधान दिन उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळांमध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय संघटनांतर्फेही संविधान दिन साजरा करण्यात आला.संविधान जागर समितीसंविधान जागर समितीतर्फे भव्य संविधान जागर रॅली काढण्यात आली़ विविध घोषाणा यावेळी देण्यात आल्या़ या रॅलीने लक्ष वेधले़ मान्यवरांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन झाले़रॅलीच्या सुरूवातील जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ़ पंजाबराव उगले, महापालिका उपायुक्त अजित मुळे, आदींनी रेल्वेस्थानकाजवळील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले़ उपस्थित जनसमुदायासमोर जिल्हाधिकारी डॉ़ ढाकणे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले़ यावेळी जागर समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे, हरिश्चंद्र सोनवणे, सुरेंद्र पाटील, शिवचरण ढंढोरे, भानुदास विसावे, सुरेश पाटील, चंदन बिºहाडे, समाधान सोनवणे, भारत सोनवणे, खुशाल चव्हाण, दिलीप सपकाळे, डॉ़ चंद्रमणीे लभाणे, अ‍ॅड़ राजेश झाल्टे, पांडुरंग बावीस्कर, प्रा़ डॉ़ प्रकाश कांबळे, नीलू इंगळे, सरोजनी लभाणे, संजय सपकाळे, डॉ़ जयेश पाडवी, डॉ़ योगेश महाले, संजय सपकाळे, डॉ़ जयेश पाडवी, डॉ़ योगेश महाले, प्रा़ प्रितिलाल पवार, अमोल कोल्हे, गनी मेमन, सचनी अडकमोल, माजी नगरसेवक राजू मोरे, डॉ़ दिलवसींग वसावे, डॉ़ मिलिंद बागुल, डॉ़ सत्यजित साळवे, फईम पटेल, अशफाक पिंजारी, दिलीप अहिरे उपस्थित होते़ दरम्यान, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, विष्णू भंगाळे, धरणगाव नगराध्यक्षा अंजलीबाई विसावे, पुष्पा महाजन आदी़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नेहरू चौक, टॉवर चौक, जुने बसस्थानक, गोलाणी मार्केट, शिवतीर्थ मैदान अशी रॅली आली़ शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले़ संविधान हाच आपला राष्ट्रवाद, धर्मनिरीपेक्ष लोकशाही, सार्वभौम, समाजवाद, जिंदाबाद आदी विविध घोषणा रॅलीत करण्यात आल्या़ विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन व आभार हरिशचंद्र सोनवणे यांनी केले़ यशस्वीतेसाठी दत्तू सोनवणे, गौतम सपकाळे, जगदीश सपकाळे, आनंदा तायडे, सुरेश तायडे, संदीप सोनवणे, साहेबराव वानखेडे, वसंत सपकाळे, नारायण सोनवणे, किरण वाघ, फकीरा अडकमोल, भिमराव अडकमोल, डी़ एम़ अडकमोल आदींनी परिश्रम घेतले़सर्वोदय माध्यमिक विद्यालयनशिराबाद येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली.मुख्याध्यापिका स्नेहल वाणी यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. स्नेहल वाणी, दिलीप चौधरी, विद्यार्थिनी संजना मगरे, प्रियंका शिंदे यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यशस्वितेसाठी हितेंद्र्र नेमाडे, लक्ष्मण कवटे, दिलीप चौधरी, रंजना चौधरी, मंगला पाटील आदींनी परिश्रम घेतले.न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबादनशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरात संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले. प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रविण महाजन व माध्यमिक विभागाचे उपशिक्षक आर. एल. पाचपांडे यांनी संविधानाचे महत्व विशद केले. प्राथमिक विभागातर्फे शर्वरी करूले, वनिता तळेले, जान्हवी महाजन, मनिष पाटील, कृष्णा सोमवंशी, पियुष चौधरी, दर्शन सुतार, नम्रता भोई व माध्यमिक विभागातर्फे हेतवी तळेले, गायत्री पाटील, दिव्या पाटील यांनी भाषण केले. विद्यालयातील उपशिक्षिका रूपाली येवले यांनी संविधानावर आधारित गीत सादर केले. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. शिल्पा धर्माधिकारी व वैशाली पाचपांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.संविधानाचे वाचन करून विद्यार्थ्यांनी घेतली शपथबहिणाबाई माध्यमिक विद्यालयात संविधानाचे सामुहिक वाचन करून विद्यार्थ्यांनी शपथ घेतली़ त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर गीत स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली़ यावेळी मुख्याध्यापक त्र्यंबक चौधरी, प्रतिभा खडके, प्रतिभा राणे, संतोष पाटील, विशाल पाटील, विलास नारखेडे, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी आदींची उपस्थिती होती़नुतन मराठा महाविद्यालयनूतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनतंर्गत संवधिान दिन साजरा करण्यात आला तर २६/११ घटनेतील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ प्रा़ आऱ पी़ बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ त्यानंतर संविधान शपथ घेण्यात आली़ कार्यक्रमाला इ़ आऱ सावकार, प्रा़ डी़ टी़ बागुल, प्रा़ एस़ इ़ पाटील, प्रा़ बी़ व्ही़ पाटील, प्रा़ आऱ डी़ कोल्हेकर, प्रा़ डी़ के़ चव्हाण आदींची उपस्थिती होती़विद्यापीठात संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचनउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व पत्रकारिता विभागामध्ये संविधान दिवस निमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांच्या उपस्थितीत विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. तर जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर, डॉ. मनिषा इंदाणी, डॉ. विनोद निताळे, डॉ. संतोष खिराडे, डॉ. गोपी सोरडे, प्रा.विश्वजित चौधरी, प्रा. महेंद्र जाधव, जयश्री पाटील, रंजना चौधरी, परमेश्वर थाटे, विष्णू कोळी आदींची उपस्थिती होती़प्राध्यापकांनी घेतली सामुहिक शपथजी. एच. रायसोनी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका व प्राचार्या प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, प्रा.मकरंद वाठ, प्रा.रफिक शेख, डॉ.दिपक शर्मा, प्रा. तन्मय भाले, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. गौरव संचेती, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. मोनाली शर्मा, प्रा. राज कांकरिया, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. विजय गर्गे, प्रा. भूषण राठी, प्रा. गौरव जैन, प्रा. योगिता पाटील उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव