शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मंदीतून सावरतेय जळगावातील बांधकाम क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 12:25 PM

सणासुदीमुळे ग्राहकांचा घर खरेदीकडे वाढतोय कल

जळगाव : नोटाबंदी, जीएसटी आणि ‘रेरा’ अशा विविध कारणांमुळे मंदी आलेल्या बांधकाम क्षेत्रात सध्या सकारात्मक वातावरण तयार होऊ लागले असून सणासुदीमुळे ग्राहक घर खरेदीसाठी पुढे येत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी कमी उत्पन्न असलेल्यांना ‘नॉन बँकिंग फायनान्स कार्पोरेशन’कडून (एनबीएफसी) पतपुरवठा थांबल्याने घरांची खरेदी कमी होत असल्याचेही चित्र बांधकाम क्षेत्रात आहे. या क्षेत्रातील मंदीच्या झळांमुळे ४० टक्के मजुरांच्या हातचा रोजगार गेला आहे तर नोटाबंदीच्या तुलनेत अजूनही घरांची विक्री निम्मीच होत आहे.उत्पादन सेवा आणि विक्री क्षेत्रात मंदीचे वातावरण असताना जळगावात बांधकाम क्षेत्रातालाही झळ आहे. मात्र सध्या सणा-सुदीचा काळ या क्षेत्राला लाभदायक ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगत आहेत.यंदा पावसाळा चांगला असल्याने हंगामही चांगला येणार असल्याच्या अंदाजाने बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून सणासुदीमुळे अनेक जण घरांबाबत विचारणा करून खरेदीलाही पसंती देत असल्याचे सांगण्यात येत आहे. यात गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी घराची पाहणी केली आणि जवळपास १०० घरांचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले.अल्प उत्पन्न असलेल्यांचा पतपुरवठा थांबलाकमी उत्पन्न असलेल्यांकडे उत्पन्नाचे कागदपत्रे नसल्याने राष्ट्रीयकृत बँकांकडून त्यांना पतपुरवठा होत नाही. असे चहा विक्रेते, रिक्षा चालक व इतर छोट्या व्यावसायिकांना ‘नॉन बँकिंग फायनान्स कार्पोरेशन’कडून (एनबीएफसी) पतपुरवठा होतो. मात्र एनबीएफसीकडूनही पतपुरवठा होत नसल्याने छोट्या व्यावसायिकांना घर खरेदीत अडचणी येत असल्याचे ‘क्रेडाई’चे राज्य सहसचिव अनिश शहा यांनी सांगितले.तीन वर्षाच्या तुलनेत घरांची खरेदी कमीचनोटाबंदी, जीएसटी लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला झळ बसू लागली. जीएसटीचा दरही कमी झाला व ‘रेरा’च्या तरतुदीही माहिती झाल्या आहेत. या स्थितीतही नोटाबंदीपूर्वीची स्थिती बांधकाम क्षेत्रात अद्याप आलेली नाही. पूर्वी महिन्याकाठी १००च्या वर घरांची विक्री होत असे. आता या क्षेत्रात सुधारणा होत असली तरी घरांची संख्या ५०च्या जवळपास जात असल्याचे बांधकाम व्यावसायिक विनय पारख यांनी सांगितले. असे तरी सणासुदीमुळे स्थिती सावरणार असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण होत असल्याचे पारख म्हणाले.६० हजारावर मजूरजळगावात जवळपास १०० बांधकाम व्यावसायिक आहेत. कोणाकडे स्वत: नियुक्त केलेले मजूर नाहीत. सेंटरिंग, गिलावा, सुतारकाम, रंगारी, प्लबिंग आदी कामांचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदार मजूर आणतात. यामध्ये सेंटरिंग काम करणारे जवळपास २० हजार व बांधकाम करणारेही २० हजार मजूर आहेत. यासह सुतारकाम,वायरमन, नळकाम, रंगारी, बिगारी अन्य सहाय्यककारी काम करणारे मिळून एकूण ६० हजार मजूर शहरात आहेत.मजुरांच्या हाताला काम नाहीघरांची विक्री कमी होत असल्याने त्याची झळ मजुरांनाही बसत आहे. एकूण ६० हजार मजुरांपैकी ४० टक्के मजुरांचा रोजगार गेला आहे. या सोबतच जळगाव बांधकाम अभियंत्यांच्याही व्यवसायही ३० टक्क्यांनी मंदावला असल्याचे जळगाव जिल्हा सिव्हील इंजिनिअर असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य तुषार तोतला यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव