वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेभुसावळ जंक्शनच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली सुमारे ५० वर्षांपूर्वीची आणि अनेक गुन्हेगार व वेळप्रसंगी आपसात तडजोडीमध्ये साक्षीदार असलेली जीआरपी अर्थात लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत अखेर मंगळवारी जमीनदोस्त होऊन इतिहास जमा झाली आहे. रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासाठी ही इमारत पाडली आहे.रेल्वे प्रशासनाने भविष्याचा विचार करून रेल्वे परिसराचे सौंदर्यीकरण तसेच संरक्षणासाठी ठिकठिकाणी संरक्षण भिती बांधल्या आहेत. रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली जीआरपीची जुनी इमारत सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. तसेच वेळप्रसंगी गैरसमजामधून झालेले वाद यालाही पोलिसांच्या ‘खाकीतील माणुसकी’मुळे अनेक तंटे आपसातच गुन्हे दाखल व्हायच्या आधी सोडवून दिले.इमारतीमध्ये एकूण १५ खोल्या होत्या. त्या सर्व खोल्या आज जमीनदोस्त करण्यात आल्या व ही इमारत आता जुन्या पार्सल आॅफिसशेजारी १६ खोल्यांमध्ये स्थलांतरीत झालेली आहे. या ठिकाणी आता भव्य उद्यानाची निर्मिती होणार आहे. थकून-भागून आलेल्या प्रवाशांना उद्यानातील हिरवळीवर वेळ घालवता येईल. या उद्यानात देशातील व परदेशातील उच्च दर्जाचे शोभिवंत फुलझाडे आणले जाणार आहे. यामुळे स्थानकाचा मुख्य प्रवेशद्वारासमोरील संपूर्ण चेहरा-मोहराच बदलून जाणार आहे.तसेच या ठिकाणी खडकी (पुणे) येथून आणलेला टी-५५ बॅटल टँक (रणगाडा) सेल्फी पॉर्इंट म्हणून ठेवण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक हे भुसावळच्या संभावीत दौऱ्यावर येणार आहे. यासाठी २४ तास मोठ्या जोमाने सुशोभिकरणाच्या कामाला गती मिळाली आहे व यानंतर स्थानकावर येणाºया वाहनांसाठी एकतर्फी ये-जा करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.उद्यानाच्या निर्मितीनंतर रेल्वे स्थानकातून थकून येणाºया तसेच काही कारणाने गाडी लेट विलंब झाल्यास प्रवाशांना उद्यानात निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवता येईल.मध्य रेल्वेतील भुसावळ जंक्शन अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. यातील प्रत्येक ठिकाणी बारकाईने निरीक्षण करून नियोजन पूर्ण विकास कामे करण्यावर भर आहे. रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील परिसर भुसावळ स्थानकाला शोभेल या पद्धतीने शोभिवंत फुलझाडे देश-विदेशातून आणण्यात येतील. यातून उद्यानात हिरवेगार लॉन लावून विकसित केले जाणार आहे.- आर. के. यादव, डीआरएम, भुसावळ
भुसावळ येथे जीआरपीची ५० वर्र्षांपूर्वीची इमारत अखेर जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 9:47 PM
मध्य रेल्वे भुसावळ जंक्शनच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली सुमारे ५० वर्षांपूर्वीची आणि अनेक गुन्हेगार व वेळप्रसंगी आपसात तडजोडीमध्ये साक्षीदार असलेली जीआरपी अर्थात लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत अखेर मंगळवारी जमीनदोस्त होऊन इतिहास जमा झाली आहे.
ठळक मुद्देरेल्वेस्थानक करणार सुशोभिकरणअनेक गुन्हे व तडजोडीची साक्षीदारजुन्या जागेवर उद्यान उभारणार